‘बेफिक्रे’ मध्ये रणवीर दिसणार कॉमेडियनच्या भूमिकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 14:10 IST2016-11-30T14:10:19+5:302016-11-30T14:10:29+5:30
रणवीर सिंगने आत्तापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या. कधी गंभीर तर कधी खट्याळ युवकाची भूमिका त्याने साकारली. चित्रपटात त्याची असलेली कॉमिक ...

‘बेफिक्रे’ मध्ये रणवीर दिसणार कॉमेडियनच्या भूमिकेत!
र वीर सिंगने आत्तापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या. कधी गंभीर तर कधी खट्याळ युवकाची भूमिका त्याने साकारली. चित्रपटात त्याची असलेली कॉमिक भूमिका सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे. त्याचे चित्रपट आणि कॉमिक भूमिका असे जणू समीकरणच बनले आहे. इंडस्ट्रीत आल्यापासून त्याला पूर्णपणे कॉमेडियनची भूमिका करण्याची त्याची खुप इच्छा होती. ती आता ‘बेफिक्रे’ च्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.
![]()
‘बॉलिवूडचा बाजीराव’ रणवीर सिंग आणि ‘क्युट लेडी’ वाणी कपूर यांचा बहुचर्चित ‘बेफिक्रे’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर आणि वाणीने साकारलेल्या भूमिकांमधील लव्हस्टोरी चित्रीत करण्यात आली आहे. रणवीर सिंगने यात ‘स्टँड अप कॉमेडियन’ची भूमिका साकारली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरने धरनची भूमिका साकारली आहे. तो पॅरिसला त्याच्या मित्राच्या कॉमेडी क्लबमध्ये सहभागी होतो. त्यानंतर त्याचा मित्र ‘देल्ही बेली’ नावाच्या क्लबचा मालक होतो. या क्लबच्या माध्यमातून त्याचे मित्र रणवीरला स्टँड अप कॉमैडी अॅक्ट सादर करण्याची संधी देतात. पॅरिसमध्ये तो सर्व चाहत्यांची वाहवा मिळवतो. ‘हॅप्पी गो लकी’ तरूण रणवीर पॅरिसमधील प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. तिथेच भेटलेली शीरा ( वाणी कपूर) देखील त्याला त्याच्यासारखीच वाटते.
![]()
आदित्य चोप्राला रणवीर सिंग एक अभिनेता म्हणून प्रचंड आवडतो. त्यामुळे त्याला खऱ्या खुऱ्या बेफिक्रे अंदाजातील रणवीरला चित्रपटात घ्यायची इच्छा होती. ‘बेफिक्रे ’च्या माध्यमातून ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रणवीर एका जाहीरातीसंदर्भात प्रचंड चर्चेत आलाय. रणवीर, चित्रपट रिलीज होणार आहे आता तरी काही वाद करू नकोस!!