‘आमिर’ मार्गावर चालणार रणबीर कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 12:38 IST2017-01-11T12:38:03+5:302017-01-11T12:38:03+5:30

होय, वाचतायं, ते खरे आहे. संजय दत्त याच्या बायोपिकसाठी रणबीर कपूर आमिर खानच्या मार्गावर चालणार आहे. आता म्हणजे नेमके ...

Ranbir Kapoor to walk on the path of 'Aamir'! | ‘आमिर’ मार्गावर चालणार रणबीर कपूर!

‘आमिर’ मार्गावर चालणार रणबीर कपूर!

य, वाचतायं, ते खरे आहे. संजय दत्त याच्या बायोपिकसाठी रणबीर कपूर आमिर खानच्या मार्गावर चालणार आहे. आता म्हणजे नेमके काय, तर संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात रणबीर वेगवेगळ्या वजनासह दिसेल. कुठल्याही प्रॉस्थेटिक मेकअपची मदत न घेता, संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टायमिंगनुसार, रणबीरला स्वत:चे वजन घटवावे तसेच वाढवावे लागेल. अगदी आमिरने ‘दंगल’साठी केले तसेच.



होय, पांढºया केसांतील महावीर फोगट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिर खानने आपले वजन वाढवले होते. यानंतर तरूणपणातील महावीर फोगट साकारण्यासाठी वजन कमी केले होते. रणबीरही अशाच काही अंदाजात आपल्या वजनाबाबत प्रयोग करेल. आता चित्रपटाचे शूटींग आमिरच्या अंदाजात केले जाते वा नाही, हे पाहणे रोमांचक ठरेल. कारण आमिरने ‘दंगल’साठी सर्वप्रथम त्या दृश्यांचे शूटींग केले, ज्यात त्याचे वजन वाढले होते. यानंतर त्याने
वजन कमी करून महावीरसिंग फोगट यांच्या तरूणावस्थेतील दृश्यांचे शूटींग केले होते.



राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या संजय दत्तच्या या बायोपिकबद्दलची कुठलीही माहिती लीक होऊ नये, असे प्रयत्न केले जात आहेत. मात्र बातम्या थांबवल्याने कुठे थांबतात. ताज्या बातमीनुसार, रणबीर कपूर सध्या वजन कमी करतोय. यानंतर पुढच्या दृश्यांसाठी त्याला वजन वाढवावे लागणार आहे. आॅर्गेनिक पद्धतीने रणबीर वजन घटवणार व वाढवणार असल्याचेही कळतेय.

संजय दत्तने पुण्याच्या येरवडा तुरुंगात घालवलेला काळ चित्रपटात दाखवला जाणार आहे. या भागाचे शूटींग हिरानींनी गतवर्षीच सुरु केली होती. आता दुस-या टप्प्याचे शूटींग येत्या फेबु्रवारीत सुरु होणार आहे. आता आमिरच्या मार्गावर निघालेला रणबीर पडद्यावर किती यशस्वी ठरतो, ते बघूच!!



Web Title: Ranbir Kapoor to walk on the path of 'Aamir'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.