रणबीर कपूर करतोय टेलिव्हिजन डेब्यू; बनणार रिअॅलिटी डान्स शोचा होस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 14:44 IST2017-03-21T09:07:48+5:302017-03-21T14:44:52+5:30
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच एक डान्स रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. होय, ऐकता ते खरे आहे. ‘नच ...

रणबीर कपूर करतोय टेलिव्हिजन डेब्यू; बनणार रिअॅलिटी डान्स शोचा होस्ट!
ब लिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच एक डान्स रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. होय, ऐकता ते खरे आहे. ‘नच बलिए’चा आठवा सीझन लवकरच येणार आहे. या डान्स रिअॅलिटी शोच्या माध्यमातून रणबीर छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. ‘नच बलिए 8’चा ओपनिंग एपिसोड रणबीर होस्ट करताना दिसेल. अर्थात केवळ या एका एपिसोडपुरताच. येत्या २ एप्रिलला हा एपिसोड आॅन एअर होईल. यासाठी रणबी अगदी सज्ज झालाय.
या ओपनिंग एपिसोडमध्ये रणबीर त्याच्याच हिट गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. त्यामुळे हा एपिसोड रणबीरच्या चाहत्यांसाठी नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. सध्या रणबीर कपूर हा संजय दत्तच्या बायोपिकमध्ये बिझी आहे. या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजय दत्तची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणार आहे. साहजिक संजू बाबासारखे हुबेहुब दिसण्यासाठी रणबीरला बराच घाम गाळावा लागला आहे.
ALSO READ : संजय दत्त अन् रणबीर कपूरच्या रंगू लागल्या मैफली!!
अलीकडे रणबीर लांब केस आणि दाढी अशा लूकमध्ये दिसला होता. (९० च्या दशकात संजय दत्तचे केस लांब होते. त्याचे ते लूक त्यावेळी भलतेच लोकप्रीय झाले होते. संजय दत्तच्या त्याच लूकमध्ये रणबीर चित्रपटात दिसणार आहे. ) याशिवाय रणबीरने या चित्रपटासाठी वजनही वाढवले आहे. यानंतर दोन महिन्याच्या ब्रेकनंतर रणबीर त्याचे वजन कमी करणार आहे. संजयचा ‘रॉकी’ हा बॉलिवूड डेब्यू सिनेमा आठवतो? या चित्रपटात संजय दत्त कसा होता. नेमक्या याच रूपात रणबीरला दिसायचे आहे. यासाठी रणबीरला बरेच वजन कमी करावे लागणार आहे. ‘रॉकी’ ते ‘खलनायक’ आणि ‘खलनायक’ ते ‘मुन्नाभाई’ अशा सगळ्या चित्रपटात संजय दत्त वेगवेगळ्या रूपात दिसला. यानंतर तुरुंगात शिक्षा भोगताना तो आणखी वेगळ्याच रूपात लोकांसमोर आला. हे सगळे टप्पे रणबीर आपल्या अभिनयातून साकारणार आहे.