रणबीर कपूर देणार सलमान-कॅटरिनाला बॉक्स आॅफिसवर टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 12:48 IST2017-01-15T12:48:49+5:302017-01-15T12:48:49+5:30

काल (दि. १४) रणबीर कपूर स्टारर संजय दत्त बायोपिकची शूटींग सुरू झाली. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी ट्विट करून याची ...

Ranbir Kapoor, Salman and Katrina face the box office! | रणबीर कपूर देणार सलमान-कॅटरिनाला बॉक्स आॅफिसवर टक्कर!

रणबीर कपूर देणार सलमान-कॅटरिनाला बॉक्स आॅफिसवर टक्कर!

ल (दि. १४) रणबीर कपूर स्टारर संजय दत्त बायोपिकची शूटींग सुरू झाली. दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी ट्विट करून याची माहिती दिली की, ‘संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाची शूटींग सुरू झाली असून आम्ही एक अत्यंत विनोदी सीन चित्रित केला आहे.’

एका मुलाखतीमध्ये हिरणाी यांनी हा चित्रपट याच वर्षाच्या शेवटी ख्रिसमसचा मुहूर्त साधत प्रदर्शित करण्याचा विचार असल्याचे सांगितले. परंतु असे जर झाले तर एक मोठा बॉक्स आॅफिस क्लॅश होण्याची संभाव्यता आहे. कारण यशराज कंपूसुद्धा नाताळच्या काळात सलमान खान-कॅटरिना स्टारर ‘टायगर जिंदा हैं’ रिलीज करण्याची प्लॅनिंग करीत आहे.

म्हणजे दोन्ही चित्रपट जर एकाच दिवशी रिलीज झाले तर रणबीर कपूर, सलमान खान, आणि दोघांची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना यांचा अनोखा संघर्ष पाहायला मिळेल. ‘एक था टागयर’चा सिक्वेल असणारा ‘टायगर जिंदा है’ची शूटींग लवकरच सुरू होणार आहे.

यावर्षी सलमानचा ‘ट्युबलाईट’सुद्धा ईदला रिलीज होणार आहे. रणबीरसुद्धा अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘जग्गा जासूस’मध्ये दिसणार आहे. येत्या ७ एप्रिल रोजी तो प्रदर्शित होत आहे. पण सर्वांना उत्सुकता लागली आहे ती नाताळाला होणाऱ्या बॉक्स आॅफिस टक्करची.

या वर्षाची सुरूवातच शाहरुख-हृतिकच्या सिनेमांच्या टक्करने होत आहे. प्रजासत्ताक दिनाला ‘रईस’ आणि ‘काबील’ची तिकीट बारीवर आमानासामाना होणार आहे. दोन मोठे स्टार्स सहसा एकाच दिवशी चित्रपट रिलीज करणे टाळतात. त्यामुळे रणबीर-सलमान क्लॅश होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे सुत्रांचे म्हणने आहे.

गेल्या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकण्याच्या एवढ्या जवळ गेलेले रणबीर-कॅट वेगळे झाले. त्याआधी कॅट-सलमानचे बे्रक अप झाले होते. आता ते दोघे पुन्हा चांगले मित्र बनले आहेत. विशेष म्हणजे कॅट यावर्षी दोन्ही एक्स बॉयफ्रेंडसोबत काम करीत आहे. ‘जग्गा जासूस’मध्ये रणबीर तर ‘टायगर जिंदा है’मध्ये सलमान तिचा को-स्टार आहे.

Web Title: Ranbir Kapoor, Salman and Katrina face the box office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.