इंटिमेट सीन करताना घाबरला होता रणबीर कपूर, म्हणाला, 'आलियासोबत प्रत्येक सीनआधी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 01:33 PM2024-01-18T13:33:21+5:302024-01-18T13:34:04+5:30

रणबीर कपूरला कशी मिळाली पत्नीची मदत?

Ranbir Kapoor reveals he was scared to do scenes in Animal used to discuss every scene with wife Alia Bhatt | इंटिमेट सीन करताना घाबरला होता रणबीर कपूर, म्हणाला, 'आलियासोबत प्रत्येक सीनआधी...'

इंटिमेट सीन करताना घाबरला होता रणबीर कपूर, म्हणाला, 'आलियासोबत प्रत्येक सीनआधी...'

अभिनेता रणबीर कपूर सध्या Animal सिनेमाचं यश एन्जॉय करतोय. रणबीरने यामध्ये रणविजय सिंहची भूमिका साकारली. बापमुलाच्या कहाणीवर सिनेमा आधारित आहे. यामध्ये रणबी कधीही न पाहिलेल्या अशा अँग्री लूकमध्ये दिसला. शिवाय त्याने नवोदित अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत काही बोल्ड सीन्सही दिले. रणबीर कपूर स्वत: अनेक सीन करण्याआधी घाबरला होता. तेव्हा पत्नी आलिया भटने त्याची कशी मदत केली याचा खुलासा नुकताच रणबीरने एका मुलाखतीत केला आहे.

Animal च्या प्रमोशनल मुलाखतीत रणबीर म्हणाला, "आम्ही दोघंही एकमेकांच्या कामाबद्दल चर्चा करत असतो. एक कलाकार म्हणून मी आलियाचा खूप आदर करतो. ती कशाप्रकारे विचार करते, एखाद्या सीनमध्ये तिचं डोकं कसं चालतं हे मला तिच्याबद्दल फार आवडतं. या सिनेमातही मी रोज जितके सीन करत होतो मी नेहमीच त्याबद्दल तिच्याशी चर्चा करायचो. तिने मला अनेक सीन्स करण्यापूर्वी मदत केली आहे. खरंतर एक अभिनेता म्हणून मी जे सीन्स करायला घाबरत होतो, जेव्हा मला वाटलं नाही हे फारच चुकीचं वाटतंय, मी कधीही मर्यादा सोडलेली नाही, मी नेहमी स्क्रीनवर गुड बॉय दिसलो तेव्हा मला आलियाने मदत केली. ती म्हणाली, ऐक हे ठीक आहे. हा फिल्मचा भाग आहे आणि त्या सीनमागे तसं कारणही आहे. त्यामुळे Animal सिनेमाच्या माझ्या प्रवासात आलिया नेहमीच माझ्यासाठी स्ट्राँग सपोर्ट राहिली आहे."

Animal मध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरचे इंटिमेट सीन्स आहेत. यामध्ये दोघांचा न्यूड सीनही आहे. या सीन्सची नंतर भलतीच चर्चा झाली होती. या सिनेमामुळे तृप्ती डिमरी रातोरात स्टार झाली. तिला चाहते 'भाभी 2' अशीच हाक मारायला लागले.

Animal सिनेमाने भारतात 500 कोटींचा बिझनेस केला. रणबीर कपूरच्या करिअरमधील हा सर्वात कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. संदीप वांगा दिग्दर्शित या सिनेमाचा पार्ट 2 ही येणार आहे. Animal Park असं सिनेमाचं नाव असणार आहे. 

Web Title: Ranbir Kapoor reveals he was scared to do scenes in Animal used to discuss every scene with wife Alia Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.