पापा ऋषी कपूरपासून दूर पळू लागलायं रणबीर कपूर... पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 11:54 IST2017-10-04T06:24:11+5:302017-10-04T11:54:11+5:30
ऋषी कपूर आणि रणबीर कपूर या दोन सुपरस्टार बाप-लेकात सध्या काही ‘आॅल वेल’ नाहीयं, असं वाटू लागलयं. ताजी बातमी ...
.jpg)
पापा ऋषी कपूरपासून दूर पळू लागलायं रणबीर कपूर... पण का?
ऋ ी कपूर आणि रणबीर कपूर या दोन सुपरस्टार बाप-लेकात सध्या काही ‘आॅल वेल’ नाहीयं, असं वाटू लागलयं. ताजी बातमी मानाल तर रणबीर सध्या आपल्या पापाला इग्नोर करू लागलाय. ऋषी कपूर तर आधीपासूनच आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे मुलांना वेळ देऊ शकले नाहीत आणि त्यांना याचे दु:खही आहे. पण आता ऋषी कपूर यांना मुलासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा आहे. पण कदाचित रणबीर या मूडमध्ये नाही.
![]()
रणबीर कपूर काही वर्षांपूर्वी आपल्या मॉम-डॅडसोबत पाली हिल्स येथे राहायचा. पण आता तो आपल्या स्वत:च्या घरात शिफ्ट झालायं आणि नेमकी हीच गोष्ट ऋषी कपूर यांना खटकतेय. चर्चा खरी मानाल तर, रणबीरने आपल्या कुटुंबाची सुरूवात पाली हिल्समधून करावी, त्याने कुटुंबासोबत राहावे, असे ऋषी कपूर यांना वाटतेय. त्यामुळे ही गोष्ट ऐनकेन प्रकारे रणबीरच्या गळी उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी रणबीरला सतत रागावणे, त्याला टोमणे मारणे असा प्रकार ऋषी कपूर यांनी सुरु केला आहे. (आता ऋषी कपूर यांचा स्वभाव आपल्याला ठाऊक आहेच.)नेमक्या पापाच्या या अशा वागण्याला घाबरून रणबीर म्हणे पापापासून दूर पळतोय. ऋषी कपूर यांच्या समोर जाण्याचे तो टाळतोय.
ALSO READ : SEE : रणबीर कपूर अन् माहिरा खानचा ‘क्लोजनेस’ दाखवणारा आणखी एक फोटो!!
रणबीर व ऋषी कपूर यांच्या मित्रत्वाचे नाते नाही, हे दोघांनीही याआधीच कबूल केले आहे. अलीकडे ऋषी कपूर नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर शो’मध्ये आला होता. यावेळीही त्याने रणबीरबद्दल हाच सूर आवळला होता. आम्ही मित्र वगैरे नाही तर टीपिकल बाप-लेकाचे नाते असते तसे माझे व रणबीरचे नाते आहे. त्याने आपल्या कपूर घरात परत यावे, अशी माझी इच्छा आहे, असे ऋषी कपूर म्हणाले होते. आता पापा ऋषी कपूरचे हे सांगणे रणबीर किती मनावर घेतो, हे येत्या काळात कळेलच. तूर्तास तरी या बापलेकातील दुरावा वाढू नये, असेच आम्हाला वाटतेय. तुम्हाला काय वाटतेय, ते जरूर कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.