​...तर "या" अभिनेत्रीमुळे रणबीर कपूरने गमविला आपला लकी चार्म !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 18:50 IST2017-09-28T13:20:45+5:302017-09-28T18:50:45+5:30

सुमारे चार पिढ्यांपासून कपूर खानदानाचे वर्चस्व बॉलिवूडमध्ये असून रणबीर कपूर खानदानाची परंपरा कायम करत आहे. रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये ‘सांवरिया’ ...

Ranbir Kapoor lost his lucky charm for this "actress"! | ​...तर "या" अभिनेत्रीमुळे रणबीर कपूरने गमविला आपला लकी चार्म !

​...तर "या" अभिनेत्रीमुळे रणबीर कपूरने गमविला आपला लकी चार्म !

मारे चार पिढ्यांपासून कपूर खानदानाचे वर्चस्व बॉलिवूडमध्ये असून रणबीर कपूर खानदानाची परंपरा कायम करत आहे. रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये ‘सांवरिया’ (२००७) या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पन केले असून आज त्याचा वाढदिवस आहे. सांवरिया हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जास्त कमाई करू शकला नाही, मात्र फिल्म सृष्टीला रणबीर कपूर कडून बऱ्याच आशा जागृत झाल्या. त्यानंतर ‘बचना ए हसिना’ या चित्रपटात त्याला दीपिका पादुकोण को-स्टार मिळाली. 

या चित्रपटानंतर मात्र दोघांच्या मैत्रीची चर्चा रंगू लागली. मात्र आपल्या मैत्रीला रणबीर टिकला नाही असे आरोप त्याच्यावर होऊ लागले. दीपिकाने तर रणबीरच्या नावाचा टॅटूदेखील बनविला होता. त्यावेळी दोघेही बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसू लागले होते. याशिवाय तर दोघांची एंगेजमेंटच्या गोष्टीही होऊ लागल्या होत्या.  

असे म्हटले जाते की, जो पर्यंत दीपिका त्याच्या सोबत होती किंवा त्यांचे ब्रेकअप झाल्याचे पूर्णपर्ण बाहेर आले नव्हते तो पर्यंत त्याचे करिअर चढत्या क्रमाने शिखर गाठत होते. दोघांनी राजनीति आणि रॉकस्टार सारखे चित्रपट केले आणि ब्रेकअप नंतरचा त्यांचा ‘ये जवानी है दीवानी’(२०१३) हा चित्रपट तर सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. 

katrina kaif ranbir kapoor

मात्र दोघांच्या या प्रेम कथेचा महत्त्वाचा भाग ब्रेकअप नसून रणबीरचा विश्वासघात आहे. कारण ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाच्या वेळेसच रणबीर कॅटरिना कैफकडे आकर्षित झाला होता. मात्र ही गोष्टीचा जास्त खुलासा झाला नव्हता.  
  
दीपिकाला असे वाटत होते की, सर्वकाही अगदी सुरळीत सुरू आहे. मात्र ती या गोष्टीपासून अनभिज्ञ होती. रणबीर कॅटरिनाकडे वळला आणि दोघांनी जोेही चित्रपट केला त्याचा मात्र खूप वाईट परिणाम झाला. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे ‘जग्गा जासूस’ होय. त्यानंतर मात्र दीपिकाने रणबीरसोबत २०१५ मध्ये ‘तमाशा’ काम केले आणि रणबीरचा हा चित्रपट हिट ठरला. त्यानंतर मात्र रणबीर हिट चित्रपटासाठी वाटच पाहत आहे. यावरुन असे वाटते की, दीपिका त्याच्यासाठी लकी चार्म होती.  

Web Title: Ranbir Kapoor lost his lucky charm for this "actress"!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.