​रणबीर कपूर- कॅटरिना कैफचा ‘जग्गा जासूस’ पुन्हा लांबला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 11:23 IST2017-02-13T05:53:28+5:302017-02-13T11:23:28+5:30

‘जग्गा जासूस’ या अनुराग बसू दिग्दर्शित चित्रपटाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत, यामागे एक नेमके कारण आहे. हे कारण म्हणजे, ...

Ranbir Kapoor - Katrina Kaif's 'Jagga Detective' again removes? | ​रणबीर कपूर- कॅटरिना कैफचा ‘जग्गा जासूस’ पुन्हा लांबला?

​रणबीर कपूर- कॅटरिना कैफचा ‘जग्गा जासूस’ पुन्हा लांबला?

ग्गा जासूस’ या अनुराग बसू दिग्दर्शित चित्रपटाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत, यामागे एक नेमके कारण आहे. हे कारण म्हणजे, यातील रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांची पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्यात प्रेक्षकांना रस आहे. होय, रणबीर व कॅटरिनाने ब्रेकअपनंतर हा चित्रपट केलायं, त्यामुळेच ब्रेकअपनंतर त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री कशी रंगते, हे प्रेक्षकांना पाहायचे आहे. पण अर्थात ही केमिस्ट्री पाहण्यासाठी आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण ‘जग्गा जासूस’ पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची खबर आहे. येत्या ११ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार होता. याच्या तीन दिवसआधी अमिताभ बच्चन आणि यामी गौतम यांचा ‘सरकार3’ रिलीज होणार आहे. ‘सरकार3’ पाठोपाठ विद्या बालनचा बहुप्रतिक्षीत ‘बेगम जान’ १४ एप्रिलला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. त्याच्या पुढच्याच आठवड्यात सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला ‘नूर’ आणि यानंतर २८ एप्रिलला बाहुबली रिलीज होतो आहे. याच धामधुमीत ‘जग्गा जासूस’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत.

विशेष म्हणजे, ‘बेगम जान’चे सहनिर्माते मिलिंद डबके यांनी हे संकेत दिले आहे. ‘जग्गा जासूस’ व ‘सरकार3’ पाठोपाठ ‘नूर’ आणि ‘बाहुबली2’च्या गर्दीत ‘बेगम जान’च्या बिझनेसवर परिणाम होईल, असे वाटत नाही का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी ‘जग्गा जासूस’ची रिलीज डेट लांबल्याचे संकेत दिलेत. ‘जग्गा जासूस’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे आम्ही ऐकले आहे आणि ‘सरकार3’ ७ एप्रिलला रिलीज होतो आहे. आमच्यासाठी एक आठवडा पुरे आहे. आमचा चित्रपट काही फार मोठा नाही. त्यामुळे आम्हाला अधिकाधिक दोन आठवडे मिळाले तरी आमचे काम भागणारे आहे, असे ते म्हणाले.

ALSO READ : OMG !! कॅटरिना कैफ का कापतेयं अनुराग बासूचे केस?
 ‘जग्गा जासूस’ च्या सेटवर कॅटरिना कैफ का बसलीय चिंताग्रस्त?

‘जग्गा जासूस’ मध्ये रणबीर कपूर एका तरूण डिटेक्टिव्हच्या भूमिकेत आहेत आणि कॅटरिना त्याला मदत करणाºया एका क्यूट मुलीच्या भूमिकेत आहे.हा डिटेक्टिव आपल्या हरवलेल्या पित्याच्या शोधात निघतो, अशी ही कथा आहे.ह्यजग्गा जासूसह्ण या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. सोबतच गोविंदा, सायानी गुप्ता, अदा शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या रोलमध्ये आहेत.  

Web Title: Ranbir Kapoor - Katrina Kaif's 'Jagga Detective' again removes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.