​रणबीर कपूरच्या विरहात कॅटरिना कैफ झाली ‘शायर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 13:16 IST2017-01-10T13:16:30+5:302017-01-10T13:16:30+5:30

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर ही ‘एक्स लव्हर्स’ची जोडी लवकरच ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात दिसणार आहे. रणबीर व कॅट ...

Ranbir Kapoor, Katrina Kaif becomes 'Shire'! | ​रणबीर कपूरच्या विरहात कॅटरिना कैफ झाली ‘शायर’!

​रणबीर कपूरच्या विरहात कॅटरिना कैफ झाली ‘शायर’!

टरिना कैफ आणि रणबीर कपूर ही ‘एक्स लव्हर्स’ची जोडी लवकरच ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात दिसणार आहे. रणबीर व कॅट सुमारे वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहिले आणि एक दिवस अचानक या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना कळली. दोघांमध्ये ब्रेकअप झाले. अर्थात प्रोफेशनल लाईफमध्ये पर्सनल लाईफ येऊ द्यायचे नाही, असे पक्के ठरवलेले असल्यानेच ही ‘एक्स लव्हर्स’ची जोडी ‘जग्गा जासूस’ या आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत.
‘जग्गा जासूस’च्या शूटींगवेळी रणबीर व कॅटचे ब्रेकअप अगदी ताजेताजे होते. साहजिक शूटींगवेळी दोघेही एकमेकांसोबत अजिबात कम्फर्टेबल नव्हते, अशा चर्चा कानावर आल्या. आता या चर्चांमध्ये किती तथ्य नि किती नाही,हे तुमच्यासह आम्हीही जाणून घ्यायला उत्सूक आहोतच. अशावेळी ‘जग्गा जासूस’च्या सेटवर रणबीरसोबत शूटींग करण्याचा कॅटचा अनुभव कसा होता? त्यावेळी कॅटने नेमके काय फिल केले? याचे उत्तर मिळाले तर?

फेसुबकवर कॅटने नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर दिलेय. तेही काहीशा काव्यात्मक भाषेत. होय, ‘जग्गा जासूस’चे एक स्टिल कॅटने शेअर केलेय आणि त्यास काहीशा अलंकारिक भाषेत कॅप्शन दिलेय.“I've seen fire and I've seen rain, seen sunny days that I thought would never end...... Jagga the journey is on”, असे कॅटने लिहिलेय.
कॅटने शेअर केलेल्या स्टिलमध्ये रणबीरच्या खांद्यावर अगदी निश्चिंत पहुडलेली कॅट दिसतेय. हे स्टिल तुम्हीही बघा, कदाचित तुम्हाला कॅटने दिलेल्या कॅप्शनचा अर्थ कळेल.  प्रेम आणि प्रेमातील ताटातूट याचा अर्थ कॅटने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलाय. अनुराग बसू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

 

Web Title: Ranbir Kapoor, Katrina Kaif becomes 'Shire'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.