रणबीर कपूरने 'अॅनिमल पार्क' सिनेमासंदर्भात दिली मोठी अपडेट, म्हणाला- "यावेळेस सगळं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:37 IST2025-09-29T15:35:34+5:302025-09-29T15:37:38+5:30
Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरने त्याचा सुपरहिट चित्रपट 'अॅनिमल'च्या सीक्वल 'अॅनिमल पार्क'बद्दल मोठी अपडेट दिली आहे.

रणबीर कपूरने 'अॅनिमल पार्क' सिनेमासंदर्भात दिली मोठी अपडेट, म्हणाला- "यावेळेस सगळं..."
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. रणबीर कपूरचे एकापाठोपाठ एक चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहेत. यादरम्यान, रणबीर कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरने त्याचा सुपरहिट चित्रपट 'अॅनिमल'च्या सीक्वल 'अॅनिमल पार्क'बद्दल मोठी अपडेट दिली आहे. यावेळी रणबीर कपूरने 'अॅनिमल पार्क' संदर्भात दिलेल्या माहितीमुळे चाहत्यांचे मन आनंदित झाले आहे.
अभिनेता रणबीर कपूर 'अॅनिमल पार्क' या आगामी चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका व्हिडीओमध्ये रणबीर कपूरने या चित्रपटाशी संबंधित माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूरने दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला. तो म्हणाला की, "संदीप यांनी माझ्यासोबत चित्रपटातील पात्र, संकल्पना आणि संगीत यावर चर्चा केली. हे सगळं यावेळेस अप्रतिम असणार आहे."
यासोबतच रणबीर कपूरने 'अॅनिमल पार्क'च्या शूटिंगबद्दलची माहितीही शेअर केली. रणबीर कपूरने सांगितले की, "२०२७ पासून 'अॅनिमल पार्क' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे." ही बातमी समोर आल्यानंतर, 'अॅनिमल पार्क'ची वाट पाहणारे चाहते आनंदी झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि युजर्स कमेंट्स करून त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
रणबीर कपूरचे आगामी प्रोजेक्ट
'अॅनिमल पार्क' व्यतिरिक्त अभिनेता रणबीर कपूर इतरही अनेक चित्रपटांतून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'रामायण पार्ट १', 'लव्ह अँड वॉर' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट २' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.