रणबीर कपूरने जिममध्ये केलं इंटेंस वर्कआऊट, पत्नी आलियाचीही कमेंट; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 04:23 PM2024-06-07T16:23:02+5:302024-06-07T16:23:34+5:30

41 वर्षीय रणबीरचा कमालीचा फिटनेस पाहून नेटकरी प्रभावित

Ranbir Kapoor did an intense workout in the gym,wife Alia also commented Video viral | रणबीर कपूरने जिममध्ये केलं इंटेंस वर्कआऊट, पत्नी आलियाचीही कमेंट; Video व्हायरल

रणबीर कपूरने जिममध्ये केलं इंटेंस वर्कआऊट, पत्नी आलियाचीही कमेंट; Video व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  भलेही सोशल मीडियावर नसला तरी त्याचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या रणबीर नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाचं शूटिंग करत आहे. यासाठी तो शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेताना दिसतोय. याआधी त्याचे वर्कआऊटचे व्हिडिओ समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा रणबीर जिममध्ये इंटेंस वर्कआऊट करताना दिसतोय. हे पाहून पत्नी आलियाही प्रभावित झाली आहे.

रणबीर कपूरने 'अॅनिमल' सारखा सुपरहिट सिनेमा दिला. यात त्याचा फिटनेस पाहून प्रेक्षक फिदा झाले होते. आता तो 'रामायण'साठी तयारी करत आहे. नुकतंच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो जिममध्ये अतिशय कठीण वर्कआऊट करताना दिसतोय. वयाच्या 41 व्या वर्षीही त्याने स्वत:ला कमालीचे फिट ठेवले आहे. या व्हिडिओत रणबीर जिममध्ये तो muscle up वर्कआऊट करताना दिसतोय. त्याच्या ट्रेनरचे व्हिडिओ शेअर केला आहे.

रणबीरचा हा व्हिडिओ पाहून चाहते तर प्रभावित झालेत. शिवाय 'खूपच मस्त' अशी कमेंट पत्नी आलियाने केली आहे. नेटकरी रणबीरला 'सुपरस्टार' म्हणत आहेत. त्याच्या या वर्कआऊट व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

रणबीरच्या पुढील प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर रामायण नंतर तो 'ब्रह्मास्त्र 2','अॅनिमल पार्क' मध्ये झळकणार आहे. तसंच संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' मध्ये विकी कौशल आणि आलियासोबत तो दिसणार आहे.

Web Title: Ranbir Kapoor did an intense workout in the gym,wife Alia also commented Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.