बाबो ! रणबीर कपूरने भर कार्यक्रमात चक्क महिला पत्रकाराला घातली लग्नाची मागणी, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 07:05 PM2020-12-18T19:05:28+5:302020-12-18T19:05:52+5:30

रणबीर कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसतो आहे.

Ranbir Kapoor demands marriage of a woman journalist in a program, watch this video | बाबो ! रणबीर कपूरने भर कार्यक्रमात चक्क महिला पत्रकाराला घातली लग्नाची मागणी, पहा हा व्हिडीओ

बाबो ! रणबीर कपूरने भर कार्यक्रमात चक्क महिला पत्रकाराला घातली लग्नाची मागणी, पहा हा व्हिडीओ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट रिलेशनशीपमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वी हे दोघे मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले होते. दोघे गोव्याला जात होते. गोव्यामध्ये फुटबॉल मॅचदरम्यानचा त्या दोघांचा एक फोटो समोर आला होता ज्यात रणबीर आणि आलिया सामन्याची मजा लुटताना दिसत आहेत.अशात आता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. यात रणबीर एका महिला पत्रकाराला माझ्या लग्न करशील असा सवाल करत आहे.


रणबीर कपूरच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पहायला मिळते आहे की,रणबीर कपूर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत आहे. यादरम्यान एक महिला पत्रकार त्याला म्हणते, या कपड्यांमध्ये तू परफेक्ट नवरदेव वाटतो आहेस. पण तू लग्न कधी करणार ? यावर रणबीर तिला म्हणतो, तुझं लग्न झाले आहे का. तू माझ्याशी लग्न करशील का मी करेन. रणबीरने विनोदी पद्धतीने दिलेले हे उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या रणबीरचा हा व्हिडीओ सोशलवर खूप व्हायरल होतो आहे. 


रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच तो अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. खास बात अशी की सिनेमात तो गर्लफ्रेंड आलिया भट सोबत काम करणारआहे. या सिनेमाच्या निमित्तानं रणबीर-आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याशिवाय रणबीर शमशेरा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

Web Title: Ranbir Kapoor demands marriage of a woman journalist in a program, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.