​दीपिका पादुकोण, कतरिना कैफ नव्हे तर या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रणबीर कपूरने साजरा केला त्याचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 14:58 IST2017-10-02T09:28:24+5:302017-10-02T14:58:24+5:30

​दीपिका पादुकोण, कतरिना कैफ नव्हे तर एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रणबीर कपूरने त्याचा वाढदिवस साजरा केला. या अभिनेत्रीने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Ranbir Kapoor celebrates birthday with Deepika Padukone, Katrina Kaif | ​दीपिका पादुकोण, कतरिना कैफ नव्हे तर या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रणबीर कपूरने साजरा केला त्याचा वाढदिवस

​दीपिका पादुकोण, कतरिना कैफ नव्हे तर या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रणबीर कपूरने साजरा केला त्याचा वाढदिवस

बीर कपूरच्या चित्रपटांपेक्षा त्याची प्रेमप्रकरणेच आजवर जास्त गाजली आहेत. कधी दीपिका पादुकोण तर कधी कतरिना कैफ यांच्यासोबतची त्याची प्रेमप्रकरणे आजवर चांगलीच गाजली आहेत. सध्या माहिरा खानसोबत असलेल्या त्याच्या जवळकीची देखील चांगलीच चर्चा होत आहे. रणबीरचा २८ सप्टेंबरला वाढदिवस झाला. पण दीपिका, कतरिना किंवा माहिरा यांच्या सोबत रणबीर कपूरने त्याचा वाढदिवस साजरा न करता त्याच्या आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्तिसोबत तो वाढदिवस साजरा करताना दिसला. 

Also Read : रणबीर कपूर आणि माहिरा खानमधील रिलेशनशिपचा ‘हा’ घ्या पुरावा; शर्टवरून लागला सुगावा!

रणबीरच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. रणबीरच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर ही व्यक्ती दुसरी कोणीही नसून त्याची आई म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री नितू सिंग आहे. रणबीरने त्याचा यंदाचा वाढदिवस खूपच चांगल्याप्रकारे साजरा केला. त्याने मीडिया प्रतिनिधी सोबत केक कापला. तसेच त्यांच्यासोबत खूप सारे फोटो देखील काढले. संध्याकाळी त्याने त्याच्या आईसोबत डिनरचा आस्वाद घेतला. या डिनरविषयी रणबीरने नव्हे तर त्याच्या आईनेच मीडियाला सांगितले आहे. रणबीर त्याच्या वाढदिवस कसा साजरा करतोय हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या फॅन्सना सांगेन असे त्याच्या फॅन्सना वाटत होते. पण त्याने सोशल मीडियाला कोणतीच पोस्ट केली नाही. मात्र त्याची आई नितू सिंगनेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर रणबीरसोबतचा फोटो पोस्ट करून आम्ही सगळ्यांनी मिळून परफेक्ट बर्थडे डिनर केला असे म्हटले आहे. या पोस्टवरून रणबीरने त्याचा वाढदिवस आईसोबत साजरा केला असल्याचे कळून येत आहे. या फोटोत रणबीर, नितूसोबत आपल्याला अयान मुखर्जीलादेखील पाहायला मिळत आहे. अयान हा रणबीर कपूरचा खूपच जवळचा मित्र आहे. त्याच्या वेक अप सिड, ये जवानी है दिवानी यांसारख्या चित्रपटांमध्ये रणबीरने काम केले आहे. 
नितू सिंग यांनी शेअर केलेल्या या फोटोला हजाराहून अधिक लोकांनी लाइक केले असून  अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

Web Title: Ranbir Kapoor celebrates birthday with Deepika Padukone, Katrina Kaif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.