केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:50 AM2023-12-27T10:50:43+5:302023-12-27T10:51:32+5:30

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीतील इनसाईड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ranbir Kapoor celebrated christmas with family pour rum on cake and blew fire and said jai mata di actor faced trolling | केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल

केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या Animal चं यश एन्जॉय करत आहे. रणबीरने वर्षाच्या शेवटी त्याचा सुपरहिट सिनेमा दिला आहे. नुकतंच रणबीरने कपूर कुटुंबासोबत ख्रिसमस सेलिब्रेशन केलं. यावेळी त्याने लाडकी लेक राहाला पहिल्यांदाच सर्वांसमोर आणलं. कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीतील इनसाईड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये रणबीर कपूरच्या एका कृतीने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

ख्रिसमस सेलिब्रेट करताना अनेक लोक रम केक बनवतात. या केकवर थोडी रम म्हणजेच अल्कोहोल असतं. कपूर कुटुंबाचा एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट, नव्या नवेली नंदासह अनेक मंडळी दिसत आहेत. दरम्यान टेबलवर एक केक ठेवला असून त्यावर एकजण दारु ओतताना दिसत आहे. यानंतर रणबीर कपूर केकला आग लावताना दिसत आहे. मात्र केक पेटवल्यानंतर रणबीर 'जय माता दी' म्हणतो आणि हे ऐकून इतर सदस्यही जय माती दी म्हणतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रम केक कापतानाचा आणि जय माता दी चा काय संबंध आहे असा प्रश्न या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांना पडला आहे.'दारु आणि जय माता दी, काय मूर्खपणा आहे','अशा लोकांना आपण उगाच आदर्श मानतोय','याला पकडून मारलं पाहिजे' अशा संतप्त कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 'आजकाल प्रत्येक गोष्टीचा मुद्दा बनवण्याची लोकांना सवयच लागली आहे' असं म्हणत काहींनी रणबीरचं समर्थनही केलं आहे. 

Web Title: Ranbir Kapoor celebrated christmas with family pour rum on cake and blew fire and said jai mata di actor faced trolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.