रणबीर कपूर ‘या’ कारणामुळे बनला ​‘बाहुबली’ प्रभासचा डायहार्ड फॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 11:04 IST2017-07-05T15:37:06+5:302017-07-06T11:04:59+5:30

‘बाहुबली’ प्रभासचा कोणी चाहता नसेल असे नाव शोधून काढणे दुरापास्तच म्हणावे लागेल. आता या यादीत अभिनेता रणबीर कपूर याचेही ...

Ranbir Kapoor became the reason for 'Bahubali' Prabhas Dehard fan! | रणबीर कपूर ‘या’ कारणामुळे बनला ​‘बाहुबली’ प्रभासचा डायहार्ड फॅन!

रणबीर कपूर ‘या’ कारणामुळे बनला ​‘बाहुबली’ प्रभासचा डायहार्ड फॅन!

ाहुबली’ प्रभासचा कोणी चाहता नसेल असे नाव शोधून काढणे दुरापास्तच म्हणावे लागेल. आता या यादीत अभिनेता रणबीर कपूर याचेही नाव जोडले गेले असून, तो प्रभासच्या अक्षरश: प्रेमात पडला आहे. जेव्हा रणबीरला त्याचा फेव्हरेट कलाकार कोण? असे विचारण्यात आले तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता प्रभासचे नाव सांगितले. रणबीरने म्हटले की, मला खरोखरच प्रभासचे काम खूप आवडले. ‘बाहुबली’मध्ये त्याचा अवतार खरोखरच अद्भुत आहे. 

सध्या रणबीर त्याच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट १४ जुलै रोजी रिलीज होणार आहे. रणबीर या चित्रपटात मुख्य भूमिकेबरोबरच चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरसोबत एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ बघावयास मिळणार आहे. एक निर्माता म्हणून आपल्या भावना व्यक्त करताना रणबीरने म्हटले की, ‘मी एक खूपच वाईट निर्माता आहे. कारण मी प्रत्येक गोष्ट त्या तत्परतेने करू शकत नाही. लोकांना तशा गाइडलाइन देऊ शकत नाही. मी खरोखरच नशीबवान आहे की, माझी बरीचसी जबाबदारी अनुराग याने पार पाडली.’

रणबीर सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी भेट देत आहे. त्याचबरोबर तो अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील हजेरी लावत आहे. शिवाय प्रमोशनसाठी तो वेगवेगळे फंडेही वापरताना दिसत आहे. त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफनेही त्याच्यासोबतच्या वादावर पडदा टाकून प्रमोशनमध्ये सहभाग घेतला आहे. वास्तविक कॅटरिना प्रमोशनमध्ये सहभागी होईल की नाही, याविषयी शंका व्यक्त केली जात होती. परंतु अनुराग बासू यांनी तिची समजूत काढून दोघांमधील मतभेद काहीसे कमी केले आहे. 

रणबीरविषयी सांगायचे झाल्यास, तो सध्या संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘दत्त’ या चित्रपटात बिझी आहे. चित्रपटात तो संजूबाबाची भूमिका साकारताना बघावयास मिळेल. त्यामुळेच तो सध्या प्रमोशनमध्ये संजूबाबाच्या अवतारात दिसत आहे. त्याच्या या चित्रपटाचीही प्रेक्षकांना प्रचंड आतुरता लागली आहे. 

Web Title: Ranbir Kapoor became the reason for 'Bahubali' Prabhas Dehard fan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.