ब्रेकअपनंतर रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच दिसले एकत्र, केलं असं काही की लोक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:58 IST2025-10-04T12:57:16+5:302025-10-04T12:58:22+5:30

Ranbir Kapoor and Deepika Padukone : ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहायला मिळाले.

Ranbir Kapoor and Deepika Padukone were seen together for the first time after their breakup, they did something that left people shocked | ब्रेकअपनंतर रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच दिसले एकत्र, केलं असं काही की लोक झाले हैराण

ब्रेकअपनंतर रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच दिसले एकत्र, केलं असं काही की लोक झाले हैराण

अभिनेत्री दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ने भलेही 'स्पिरिट' आणि 'कल्की २' या दोन मोठ्या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला. शनिवारी सकाळी अभिनेत्री मुंबई एअरपोर्टवर स्टायलिश लूकमध्ये दिसली. विशेष म्हणजे, त्यावेळी दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर (Ranbir Kapoor) देखील डॅशिंग लूकमध्ये एअरपोर्टवर दिसला. दोघांचेही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

रणबीर कपूरने शनिवारी सकाळी एअरपोर्टवर धमाकेदार एंट्री घेतली. यावेळी 'ॲनिमल' अभिनेत्याने काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता आणि तो खूपच डॅशिंग दिसत होता. रणबीर कपूरने काळी कॅप आणि सनग्लासेस देखील लावले होते. यावेळी त्याने पापाराझींना अभिवादनही केले. रणबीर कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहते त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत.


तर दीपिकाच्या एअरपोर्ट लूकबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्रीने ग्रे रंगाचा को-ऑर्ड सेट घातला होता, ज्यामध्ये झिप-अप कॉलर जॅकेट आणि रुंद पायांची पिनस्ट्राइप ट्राउझर होती. तिने हा लूक मोठे काळे सनग्लासेस, छोटे इअररिंग्स आणि स्लीक बनसह पूर्ण केला होता. दीपिकाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडत आहे आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


काही वर्षांपूर्वी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण रिलेशनशीपमध्ये होते, पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. मात्र, ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणला एकत्र एअरपोर्टवर पाहण्यात आले. दोघांना एकत्र पाहून त्यांचे चाहतेही आनंदी झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांनी एकमेकांना मिठीही मारली. दोघेही एकाच कार्टमध्ये बसलेले असतानाचे त्यांचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत, ज्यामुळे लोक 'पॅचअप झालं की काय?' अशी चर्चा करत आहेत.

Web Title: Ranbir Kapoor and Deepika Padukone were seen together for the first time after their breakup, they did something that left people shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.