Brahmastra Movie : ‘ब्रह्मास्त्र’साठी मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरने किती फी घेतली माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 10:18 AM2022-04-17T10:18:54+5:302022-04-17T10:20:14+5:30

Ranbir Kapoor Alia Bhatt Fees For Brahmastra: : ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर यांच्यात प्रेम बहरलं. शिवाय या चित्रपटासाठी दोघांनीही तगडी फी वसूल केली. 

ranbir kapoor and alia bhatt charged fees for the brahmastra know other stars fees | Brahmastra Movie : ‘ब्रह्मास्त्र’साठी मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरने किती फी घेतली माहितीये?

Brahmastra Movie : ‘ब्रह्मास्त्र’साठी मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरने किती फी घेतली माहितीये?

googlenewsNext

Ranbir Kapoor Alia Bhatt Fees For Brahmastra:  आलिया भट ( Alia Bhatt) व रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकतेच लग्नबंधनात अडकले. यानंतर काय तर, लवकरच हे नवदांम्पत्य आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होणार आहेत. होय, दोघांचाही ‘ब्रह्मास्त्र’  (Brahmastra) हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आलिया व रणबीर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर यांच्यात प्रेम बहरलं. शिवाय या चित्रपटासाठी दोघांनीही तगडी फी वसूल केली. 

बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीरने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी घेतली आहे. होय, त्याने या चित्रपटासाठी सर्वाधिक 25 ते 30 कोटींचं मानधन घेतलं आहे.

 मिसेस कपूर अर्थात आलिया भटने या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं माहितीये? तर ‘ब्रह्मास्त्र’साठी तिने 10 ते 12 कोटी चार्ज केल्याचं कळतंय.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.  या चित्रपटासाठी अमिताभ यांनी 8 ते 10 कोटींचं मानधन घेतलं आहे.
  साऊथचा सुपरस्टार नागार्जुन हाही या चित्रपटाचा भाग आहे. त्याने या चित्रपटासाठी 9 ते 10 कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.   मौनी रॉय ही सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी तिने 3 कोटीी फी घेतल्याची चर्चा आहे.

गेल्या पाच वर्षांपासून ‘ब्रह्मास्त्र’चं शूटींग सुरू होतं. हा चित्रपट तीन भागात प्रदर्शित होतोय. पहिला भाग येत्या 9 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. यात रणबीर शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा पाच भाषांत एकाचवेळी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
 

Read in English

Web Title: ranbir kapoor and alia bhatt charged fees for the brahmastra know other stars fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.