रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:48 IST2024-04-30T16:47:45+5:302024-04-30T16:48:16+5:30
RK चा डॅशिंग लूक पाहून चाहते त्याच्या प्रेमातच पडले आहेत.

रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
हिंदी सिनेसृष्टीतील मोस्ट रोमँटिक कपल म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट. दोघं जिथे जातात तिथे त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमा होते. रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) फुटबॉल चीम आहे. मुंबई सिटी एफसी ही त्याची टीम इंडियन सुपर लीगमध्ये फायनलपर्यंत पोहोचली आहे. आपल्या टीमच्या या यशावर रणबीर आणि आलिया (Alia Bhat)दोघंही खूप खूश आहेत. मॅचच्या ठिकाणी रणबीर आणि आलियाने हजेरी लावली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रणबीर कपूर सध्या आगामी 'रामायण' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यातून वेळात काढून तो आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला. आलिया भटनेही त्याच्यासोबत हजेरी लावली. व्हाईट टॉप, ऑफ व्हाईट शॉर्ट्स , जॅकेट आणि डोक्यावर कॅप असा आलियाचा कॅज्युअल लूक होता. तर रणबीरही कूल लूकमध्ये दिसला. दोघांनी ग्राऊंडवर चक्कर मारत सर्वांना हात केला. तर रणबीरने खेळाडूंशी संवाद साधला. त्यांचं अभिनंदन केलं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आलिया भटने नुकतंच तिच्या निर्मितीखाली बनलेल्या 'जिगरा' सिनेमाचं शूट पूर्ण केलं. यानंतर ती संजय लीला भन्साळींच्या आगामी 'लव्ह अँड वॉर','ब्रह्मास्त्र 2' सिनेमातही झळकणार आहे. या दोन्ही सिनेमांमध्ये रणबीर कपूरही दिसणार आहे.