आलिया आणि रणबीर पुन्हा सुरु करणार 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग, निश्चित बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करण्याचे आव्हान

By गीतांजली | Updated: November 4, 2020 17:59 IST2020-11-04T17:52:01+5:302020-11-04T17:59:30+5:30

लॉकडाऊनमध्ये अयान मुखर्जीने सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामावर जोर दिला.

Ranbir kapoor alia bhatt nagarjuna starts shoot for brahmastra | आलिया आणि रणबीर पुन्हा सुरु करणार 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग, निश्चित बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करण्याचे आव्हान

आलिया आणि रणबीर पुन्हा सुरु करणार 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग, निश्चित बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करण्याचे आव्हान

जवळपास आठ महिन्यानंतर अयान मुखर्जी आपला आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. उर्वरित १० ते १२ दिवसांचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी निर्मात्यांनी मुंबईतील एका स्टुडिओमध्ये हा सेट तयार केला आहे. कोरोना व्हायरसच्या आधी  'ब्रह्मास्त्र'ची शूटिंग मुंबई सुरु होती. अमिताभ बच्चन यांनी आपल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले होते आणि चित्रपटाचे  केवळ दीड ते दोन आठवड्याचे शूटिंग बाकी असताना लॉकडाऊनमची घोषणा झाली आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. 

लॉकडाऊनमध्ये अयान मुखर्जीने सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामावर जोर दिला.  दरम्यान, त्याने या चित्रपटाच्या मोठ्या भागावर काम केले आणि अशा प्रकारे त्यांना या चित्रपटाच्या लांबीची कल्पनाही मिळाली. फॉक्स स्टार स्टुडिओने अयानला चित्रपटाची लांबी थोडी कमी ठेवण्यासाठी सूचना दिल्या अशी चर्चा होती. यामुळे प्रॉडक्शनचा खर्च कमी होईल आणि प्रेक्षकही चित्रपटाशी जोडले जातील. आता अयान या सिनेमाच्या ठरवलेल्या बजेटमध्ये उर्वरित शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त आहे.

अयान रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जानेवारी महिन्यात 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची दोन राहिलेली गाणी पूर्ण करणार आहेत, असं सांगण्यात येत आहे. 'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर शिवाची भूमिका साकरणार आहे तर आलिया त्याच्या प्रियसीची. नागार्जुन, अमिताभ आणि मौनी रॉय यांच्यादेखीत यात भूमिका आहेत. 
 

Web Title: Ranbir kapoor alia bhatt nagarjuna starts shoot for brahmastra