रॅम्पवॉक सोपा नव्हे -इलियाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:37 IST2016-10-20T12:37:47+5:302016-10-20T12:37:47+5:30

फॅशनेबल ड्रेसेस अन् आकर्षक ज्वेलरी घालून मॉडेल्स मोठया दिमाखात रॅम्पवर मिरवतांना दिसतात. त्यांच्या रॅम्पवरील अदा समोर बसलेल्यांची मने जिंकून ...

Rampwock is not easy - Liliana | रॅम्पवॉक सोपा नव्हे -इलियाना

रॅम्पवॉक सोपा नव्हे -इलियाना

शनेबल ड्रेसेस अन् आकर्षक ज्वेलरी घालून मॉडेल्स मोठया दिमाखात रॅम्पवर मिरवतांना दिसतात. त्यांच्या रॅम्पवरील अदा समोर बसलेल्यांची मने जिंकून घेतात. पण दाक्षिणात्य ब्युटी इलियाना डिक्रुझ हिला विचाराल तर ग्लॅमर आणि झगमगाटातील हा रॅम्पवॉक सोपा मात्र नक्कीच नाही.   

 रॅम्पवरील अनुभव शेअर करताना इलियाना म्हणते, रॅम्प वॉक मला कधीच सोपा वाटला नाही. आजही रॅम्पवॉक करताना मी कायम स्वत:ला सांगत असते,‘डोन्ट फॉल, डोन्ट फॉल, डोन्ट फॉल. तू एक उत्तम अभिनेत्री आणि मॉडेलही आहेस. माझ्या कामाची सकारात्मक ऊर्जा नेहमीच माझ्यासोबत असते. त्या ऊर्जेच्या साहाय्याने मी रॅम्पवॉक करू शकते. रॅम्पवॉक इज नॉट अ इझी टास्क तुमच्यासमोर अनेक कॅमेरे लागलेले असतात. तुम्हाला स्वत:ला व्यक्त करावं लागतं. सर्वांच्या  नजरा तुमच्यावर खिळलेल्या असतात. अशावेळी तुम्ही अस्वस्थ होणं साहजिक आहे. हे सगळं मॉडेल्स कशा मॅनेज करत असतील काय माहीत? मला जर अभिनय सोडून रॅम्पवॉक करायला सांगण्यात आलं तर मी करूच शकणार नाही. मला मॉडेलिंगपेक्षाही अभिनय जास्त महत्त्वाचा वाटतो. अभिनयात तुम्हाला तुमची भूमिका सोबत घेऊन जायची असते. भूमिकेला तुम्हाला मोठं करावं लागतं. 

Web Title: Rampwock is not easy - Liliana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.