रमन राघव - 'UGLY' चित्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 14:21 IST2016-06-24T06:10:54+5:302016-06-24T14:21:11+5:30

सुवर्णा जैन स्टार- 2 स्टार 'रमन राघव 2.0' हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा सिनेमा. अनुरागची निर्मिती असलेल्या 'उडता पंजाब'भोवती निर्माण ...

Raman Raghav - 'UGLY' depiction | रमन राघव - 'UGLY' चित्रण

रमन राघव - 'UGLY' चित्रण

n style="color:#4B0082;">सुवर्णा जैन

स्टार- 2 स्टार

'रमन राघव 2.0' हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा सिनेमा. अनुरागची निर्मिती
असलेल्या 'उडता पंजाब'भोवती निर्माण झालेल्या वादानंतर अनुराग दिग्दर्शित
हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा रमन राघव नावाच्या सायको
सिरीयल किलर असलेल्या रियल व्यक्तीवर आधारित आहे. 1960 च्या दशकात रमन
राघव नावाच्या सिरीयल किलरची मुंबईत दहशत पसरली होती.


सिनेमात सायको सिरीयल किलर रामण्णाची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीनं
साकारलीय. नवाजुद्दीननं आपल्यादमदार अभिनयानं या भूमिकेला वेगळ्या उंचीवर
नेऊन ठेवलंय. नवाजुद्दीनच्या अभिनयाच्या विविछ छटा तुम्हाला नक्कीच
भावतील. तो तुम्हाला कधीही भितीदायक वाटेल. तर दुसरा सायको सिरीयल
किलरचा पाठलाग करणारा विकीकौशलनं साकारलेला राघवन हा पोलीसही तितकाच भाव
खाऊन जातो.

या सिनेमात अमृता सुभाष, आणि मिस इंडिया अर्थ 2013 ची शोभिता धुलिपाला
हिनं भूमिका साकारली.शोभिताचा हा पहिलाचा सिनेमा आहे. मात्र या
दोघींच्याही भूमिकांमध्ये काही करण्यासारखं नसल्याचं वाटतं. अभिनेत्रींना
सिनेमात दिलेलं कमी महत्त्व, वैविधत्येचा अभाव ही सिनेमाचा वीक पॉइंट ठरू
शकतो.

राम संपत यांनी सिनेमाला संगीत दिलंय.सिनेमात एकही गाणं नसून फक्त संगीत
एखाद्या सीनच्या
बॅकग्राऊंडला सुरु असतं. या संगीतामध्ये निराशा, राग व्यक्त झाला असला
तरी सिनेमा बघताना ते संगीत कर्णकर्कश आणि डोईजड वाटतं.

अनुराग कश्यपचा हा सिनेमा कसा असेल अशी उत्सुकता रसिकांना होती. हा
सिनेमा म्हणजे टिपिकल अनुराग कश्यप स्टाईल म्हणावा लागेल. हा सिनेमा
पाहताना तुम्हाला कधी त्याच्याच 'अग्ली' आणि 'गँग ऑफ वासेपूरचीही' आठवण
येईल. सिनेमात अतिरक्तरंजितपणा दाखवल्यासारखं वाटेल. मात्र ती कथेची गरज
असल्यानं त्याकडे काहीसं दुर्लक्ष करता येऊ शकतं.  

हा सिनेमा पाहायचा असेल तर तो फक्त नवाजुद्दीनच्या अभिनयासाठी पाहावा असाच म्हणावं लागेल..
सायको सिरीयल साकारताना नवाजुद्दीनं त्यात जीव ओतलाय.

Web Title: Raman Raghav - 'UGLY' depiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.