राम कपूरच्या अलिबागमधील ‘या’ अलिशान व्हिलाची किंमत वाचून व्हाल अवाक्; फोटो पाहून पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 01:06 PM2022-01-19T13:06:47+5:302022-01-19T13:34:13+5:30

Ram Kapoor Villa In Alibaug : मुंबईजवळ निसर्गाच्या सानिध्यात घर असणं हे अनेक सेलिब्रिटींचं स्वप्न असतं. छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार राम कपूर याचंही हेच स्वप्नं होतं आणि त्याचं हे स्वप्नं पूर्ण झालंय

Ram Kapoor Bought A Rs 20 Cr Villa In Alibaug see pics | राम कपूरच्या अलिबागमधील ‘या’ अलिशान व्हिलाची किंमत वाचून व्हाल अवाक्; फोटो पाहून पडाल प्रेमात

राम कपूरच्या अलिबागमधील ‘या’ अलिशान व्हिलाची किंमत वाचून व्हाल अवाक्; फोटो पाहून पडाल प्रेमात

googlenewsNext

मुंबईजवळ निसर्गाच्या सानिध्यात घर असणं हे अनेक सेलिब्रिटींचं स्वप्न असतं. छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार राम कपूर (Ram Kapoor ) याचंही हेच स्वप्नं होतं आणि त्याचं हे स्वप्नं पूर्ण झालंय. होय,  राम आणि त्यांची पत्नी गौतमी यांनी मिळून अलिबाग येथे एक अलिशान व्हिला खरेदी केला आहे. (Ram Kapoor Villa In Alibaug)

त्याच्या या अलिशान व्हिलाचे फोटो पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. रामच्या या व्हिलाची किंमत 20 कोटी रूपये आहे. यात 4 बेडरूम आहेत, प्रायव्हेट पूल आणि अन्य सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.

(फोटो- © Avas wellness)

कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी या घरात एक स्वतंत्र बेडरूम आहे. डायनिंग एरिया, ओपन किचन सगळं सुंदर पद्धतीने सजवण्यात आलं आहे.
 2017 पासून राम कपूर एका नव्या जागेच्या शोधात होता. त्याचं गोवा आणि खंडाळ्याला आधीपासूनच घर आहे. पण तिथे आणखी एक घर घेण्यात काहीच अर्थ नव्हता.

मुंबईतील घराचा एका भाग वाटेल, असं घर त्याला हवं होतं. अखेर अलिबागला त्याला त्याचं मनाजोगं घरं मिळालं. मुंबईवरून अलिबागला जाणं खूप सोपं झालं, म्हणून राम कपूरने वेळ न घालवता हे घर खरेदी केलं.

याबद्दल तो म्हणाला, मला असं घर हवं होतं जिथे मी माझ्या कुटुंबासोबत अगदीच कमी वेळात जाऊ शकेन आणि माझ्या वीकेण्डचा आनंद घेऊ शकेन. गोवा आणि खंडाळा छान आहेत पण ते माझ्या घरापासून दूर आहेत. जिथे माझी नातवंड देखील मजा करू शकतील, असं  घर घेण्याचं माझं स्वप्न होतं आणि आता ते पूर्ण झालं.

राम कपूरला आपण  घर एक मंदिर,  कसम से,  बडे अच्छे लगते है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये पाहिलं आहे.अनेक चित्रपटातही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  घर एक मंदिर  या मालिकेतील रामच्या कामाचं अमाप कौतुक झालं होतं. पण  त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेनं. या मालिकेनंतर त्याचं संपूर्ण करियर बदललं असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आज राम हा छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय आणि महागडा अभिनेता आहे. 

Web Title: Ram Kapoor Bought A Rs 20 Cr Villa In Alibaug see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.