​राम गोपाल वर्मांच्या tweetने रजनीचे चाहते नाराज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 19:23 IST2016-04-19T13:53:10+5:302016-04-19T19:23:10+5:30

राम गोपाल वर्मा कधी काय बोलतील नेम नाही. आपल्या वादग्रस्त tweetनी ते सतत चर्चेत असतात. याहीवेळी त्यांनी एक tweet ...

Ram Gopal Varma's tweet displeases Rajni's fans! | ​राम गोपाल वर्मांच्या tweetने रजनीचे चाहते नाराज!!

​राम गोपाल वर्मांच्या tweetने रजनीचे चाहते नाराज!!


/>राम गोपाल वर्मा कधी काय बोलतील नेम नाही. आपल्या वादग्रस्त tweetनी ते सतत चर्चेत असतात. याहीवेळी त्यांनी एक tweet केले नि वाद ओढवून घेतला. त्यांच्या या tweetने मेगास्टार रजनीकांतचे चाहते प्रचंड दुखावले गेले. सोशल मीडियावर तीव्र टीका झाल्यानंतर अखेर राम गोपाल वर्मा सारवासारव करताना दिसले. राम गोपाल वर्मा यांनी रजनीकांत यांच्या दिसण्याबद्दल tweet केले. ‘रोबोट २’ची अभिनेत्री एमी जॅक्शन हिने तिचा व रजनीकांतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतरच या वादाला सुरुवात झाली. हा फोटो पाहून ‘वाईट दिसूनही रजनीकांत सुपरस्टार आहेत’ अशा आशयाचे tweet राम गोपाल यांनी केले. ‘साऊथचा गॉड’ मानल्या जाणाºया रजनीकांत यांच्याबद्दलच्या राम गोपाल यांच्या  या आक्षेपार्ह tweetवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रतिक्रियेनंतर राम गोपाल  सारवासारव करताना दिसले. माझ्या मते रजनींचे काही चाहते मूर्ख आहेत. मी त्यांची प्रशंसा करीत होतो, हे त्यांना कळलेच नाही. कुठलाही हँडसम व्यक्ती स्टार बनत असेल तर त्यात काही मोठी गोष्ट नाही. मात्र रजनीकांतसारखा दिसणारा माणूस एवढा मोठा स्टार होतो, ही निश्चित एक कॉम्प्लिमेंट आहे. देवाने रजनीकांत यांना दुसºयांपेक्षा जास्त दिले आहे. माझ्या tweetचा हाच अर्थ होतो. पण काही मूर्ख लोक ते समजू शकले नाहीत,असे राम गोपाल वर्मा म्हणाले.
 

This man by being the biggest star ever completely destroys the notion of looks being important for stardom

Web Title: Ram Gopal Varma's tweet displeases Rajni's fans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.