​जयललितावर चित्रपट बनविणार राम गोपाल वर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 22:00 IST2016-12-16T22:00:15+5:302016-12-16T22:00:15+5:30

सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ख्यात असलेले निर्माता व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर ...

Ram Gopal Varma will make a film on Jayalalithaa | ​जयललितावर चित्रपट बनविणार राम गोपाल वर्मा

​जयललितावर चित्रपट बनविणार राम गोपाल वर्मा

ong>सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ख्यात असलेले निर्माता व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर चित्रपट तयार करणार असल्याची माहिती आहे. एका महिलेचा अभिनेत्री ते नेता होण्याचा प्रवास ते एका चित्रपटातून मांडणार असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे जयललिता राजकारणांत येण्यापूर्वी तामीळ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे नुकतेच निधन झाले. सुमारे ७५ दिवस त्या इस्पितळात उपचार घेत होत्या. त्यांना २२ सप्टेंबरला चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ५ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृती बद्दल सरकार व हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून फार कमी माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे जयललिता यांच्या मृत्यूला एक षडयंत्र म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या मृत्यूसाठी त्यांच्या पार्टीच्या लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जयललिता यांचा मृत्यू हृदय विकाराने नव्हे तर तो खून असल्याचे बोलले जात आहे.
 
Ram Gopal Varma to make film on jayalalithaa

सध्या राम गोपाल वर्मा जयललिता यांच्या जीवनावर चित्रपटांची निर्मिती करण्याचा विचार करीत आहे. यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असून ते परमिशनच्या प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात येते. वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. रामू यांनी लिहले, मी आपल्या नव्या चित्रपटाचे टायटल ‘शशिकला’ हे रजिस्टर केले आहे. हा चित्रपट माझी सर्वांत जवळची मित्र व राजकारणी वर आधारित आहे. 

राम गोपाल वर्मा यांनी यापूर्वी राजकारणी नेत्यावर आधारित सरकार हा चित्रपट तयार केला आहे. सरकारची कथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. रामू सध्या सरकार ३ च्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. 

Ram Gopal Varma to make film on jayalalithaa

Web Title: Ram Gopal Varma will make a film on Jayalalithaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.