राम गोपाल वर्माने पुन्हा सोडली पातळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 09:06 IST2016-03-12T16:06:19+5:302016-03-12T09:06:19+5:30

एकेकाळचा मास्टर दिग्दर्शक आणि सध्या वादग्रस्त व्यक्तिकत्त्व असणाºया राम गोपाल वर्माच्या विषारी ट्विटसचा धनी होण्याचा मान विजय मल्ल्यांना मिळाला ...

Ram Gopal Varma has dropped again | राम गोपाल वर्माने पुन्हा सोडली पातळी

राम गोपाल वर्माने पुन्हा सोडली पातळी

ेकाळचा मास्टर दिग्दर्शक आणि सध्या वादग्रस्त व्यक्तिकत्त्व असणाºया राम गोपाल वर्माच्या विषारी ट्विटसचा धनी होण्याचा मान विजय मल्ल्यांना मिळाला आहे.

कर्जबुडी प्रकारणामध्ये अडचणीत आलेल्या मल्ल्यांवर राम गोपाल वर्मांनी ट्विटरवर चांगलेच तोंडसुख घेतले. असे करत असताना वर्माने पुन्हा एकदा पातळी सोडली.

त्याने ट्विट केले की, मल्ल्याने बँकेला कर्जाच्या बदल्यात ‘किंगफिशर कॅलेंर गर्ल’ची मेजवानी द्यावी. या बँकाच्या पैशावरच त्याने तोकड्या कपड्यांच्या मॉडेल्सचे फोटो असणारे कॅलेंडर्स बनविले आहे. त्यामुळे पैशाचा बदल्यात बिकिनीतील सौंदर्य हा सौदा करण्यास हरकत नसावी.

{{{{twitter_post_id####}}}}



{{{{twitter_post_id####}}}}


ट्विटरवरून अनेकांवर चौफेर टीका करणाऱ्या वर्माच्या अशा प्रकारच्या असभ्य ट्विट्समुळे सर्व स्तरातून त्याचा निषेध होत आहे.

महिलांबद्दल इतके हीन शब्द वापरणे, त्यांचा वस्तू म्हणून उल्लेख करणे अत्यंत अशोभणीय बाब आहे, चित्रपट चालत नाही म्हणून अशा प्रकारे सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा हा वर्माचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा सुर सोशल मीडियावर लावला जात आहे.

Photo Credit : AP Herald

Web Title: Ram Gopal Varma has dropped again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.