'वॉर २'मधील कियाराच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्माची अश्लील कमेंट, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:19 IST2025-05-21T17:19:13+5:302025-05-21T17:19:42+5:30
कियाराच्या या बिकिनी लूकवरुन राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी अभिनेत्रीवर अश्लील कमेंट केली होती.

'वॉर २'मधील कियाराच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्माची अश्लील कमेंट, नेटकऱ्यांनी धरलं धारेवर, म्हणाले...
हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असलेल्या 'वॉर २' सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआरपेक्षा कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकचीच जास्त चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या टीझरमध्ये प्रेग्नंट कियाराची बिकिनीमधील झलक पाहायला मिळाली. 'वॉर २'मधील कियाराचा बिकिनी लूक सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.
कियाराच्या या बिकिनी लूकवरुन राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी अभिनेत्रीवर अश्लील कमेंट केली होती. "देश आणि समाजा ऐवजी जर हृतिक आणि ज्युनियर एनटीआरमध्ये ही कोणाला भेटणार यावरुन वॉर झालं तर 'वॉर २' बॅकबस्टर असेल", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. पण, त्यांच्या या ट्वीटवरुन मात्र नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
"यांचं डोकं खूप वर्षांपूर्वीच खराब झालं आहे", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "जो माणूस सोशल मीडियावर अशा गोष्टी लिहू शकतो, तो त्याच्या आयुष्यात काय विचार करत असेल", अशी कमेंट केली आहे. "आरजीव्ही नेहमीच त्यांच्या अश्लील कमेंटमुळे चर्चेत असतात", असंही एकाने म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी त्यांचं ट्वीट डिलीट केलं आहे.