'रामचरण'साठी कायपण! फॅन्स चढले हॉटेलच्या भिंतीवर, एकच कल्ला; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:02 IST2022-05-05T15:52:57+5:302022-05-05T16:02:34+5:30
साऊथ स्टार्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये अभिनेता राम चरणचा समावेश आहे, ज्यांची लोकप्रियता RRR चित्रपटानंतर आणखी वाढली आहे.

'रामचरण'साठी कायपण! फॅन्स चढले हॉटेलच्या भिंतीवर, एकच कल्ला; नेमकं काय घडलं?
साऊथ स्टार्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये अभिनेता राम चरणचा समावेश आहे, ज्यांची लोकप्रियता RRR चित्रपटानंतर आणखी वाढली आहे. अलीकडेच, राम चरण एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी विशाखापट्टणमला पोहोचला होता, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यात राम चरण ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे त्या हॉटेलबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. राम चरणाचे एक झसक पाहण्यासाठी लोक हॉटेलच्या भिंतींवर चढताना दिसतायेत.
राम चरण सध्या दिग्दर्शक शंकर यांच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत ज्यात त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात राम चरण एका IAS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
Craziest Crowd & People in Vizag going Maddd for RAM CHARAN In Radisson Hotel🔥🔥
— Kalyan Dhoni (@KalyanDhoni3) May 4, 2022
Insane Love for Man Of Masses @AlwaysRamCharan in Vizag...!!
#ManOfMassesRamCharan#RamCharanInVizag#RC15pic.twitter.com/Azu0ltzPKg
विशाखापट्टणममध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याची माहिती चाहत्यांना कळताच ते राम चरणच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने विमानतळावर पोहोचले. राम चरण विमानतळावरून बाहेर आला तेव्हा लोक त्याच्या नावाने जोर जोरात ओरडू लागले.
Craze of Ram Charan at Vizag airport 🔥🔥🔥💥💥💥@AlwaysRamCharan#RamCharan#RC15@TrendsRamCharan#RamCharan𓃵pic.twitter.com/rHIDcZbgR2
— Being Human 💖💖 (@beinghuman_5) May 4, 2022
दुसर्या व्हिडिओ क्लिपमध्ये राम चरणाची वाट पाहताना त्याच्या स्वगतेसाठी फुलांचा वर्षाव करत होते. दिग्दर्शक शंकर यांच्या सोबतचा राम चरणचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे शंकर तेलगू चित्रपटांमध्येही पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल एप्रिलमध्ये अमृतसरमध्ये झाले होते, जिथे राम चरणने सीमा सुरक्षा दलाला भेटण्यासाठी वेळ काढला होता. एवढेच नाही तर पत्नी उपासना हिने सुवर्ण मंदिरात लंगरचे आयोजन केले होते.