Ram Charan Birthday: लांब केस, डोळ्यांवर चष्मा... रामचरणच्या पहिल्या वहिल्या ऑडिशनचा VIDEO होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:36 AM2023-03-27T11:36:14+5:302023-03-27T11:41:05+5:30

Ram Charan Birthday: रामचरणने १८ वर्षांपूर्वी पहिलं ऑडिशन दिलं होतं. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

ram charan first ever audition video with shriya saran Ram Charan Birthday | Ram Charan Birthday: लांब केस, डोळ्यांवर चष्मा... रामचरणच्या पहिल्या वहिल्या ऑडिशनचा VIDEO होतोय व्हायरल

Ram Charan Birthday: लांब केस, डोळ्यांवर चष्मा... रामचरणच्या पहिल्या वहिल्या ऑडिशनचा VIDEO होतोय व्हायरल

googlenewsNext

Ram Charan Birthday: साऊथ सुपरस्टार रामचरणची आताश: वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीये. आरआरआर चित्रपटानंतर तो जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. आज २७ मार्चला रामचरण त्याचा ३८ वा वाढिदवस साजरा करतो. इतक्या लहान वयात राम चरणने नेम फेम सगळं कमावलं. चिरंजीवी यांचा मुलगा असण्यासोबतच त्याने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. याच रामचरणचा पहिल्या ऑडिशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मुंबईच्या एका ॲक्टिंग स्कूलमध्ये शिकत असतानाचा हा व्हिडीओ आहे.
या ऑडिशन व्हिडीओमध्ये रामचरण ओळखूही येत नाही. त्याचा लुक, त्याचा अंदाज, त्याचे हावभाव सगळेच वेगळे आहेत. व्हिडीओत त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री श्रिया सरन दिसतेय. दोघंही आज साऊथचे स्टार्स म्हणून ओळखले जातात.  

बॅचलर ऑफ कॉमर्स ही डिग्री पूर्ण करण्यासाठी रामचरणने सेंट मेरी कॉलेज, हैदराबाद येथे ॲडमिशन घेतलं. पण अभ्यासात त्याचे मन रमेना. कारण अभिनय त्याला खुणावत होता. चिरंजीवीसारख्या मेगास्टारचा मुलगा म्हटल्यावर त्याला सहज संधी मिळाली असती. पण रामचरणने अभिनय शिकण्याचं ठरवलं.  मुंबईमधील किशोर नमीत कपूर ॲक्टिंग स्कूलमध्ये त्याने ॲडमिशन घेतलं. या ॲक्टिंग स्कूलमधून अभिनेता हृतिक रोशन, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, करिना कपूर यांनी देखील अभिनयाचे धडे घेतले आहेत.

२००७ साली प्रदर्शित झालेल्या 'चिरुथा' या सिनेमातून रामचरणने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.  तेलुगू भाषेतील हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला होता. मुख्य म्हणजे या चित्रपटाचं शूटींग फक्त ५० दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. एडिटिंग करून १७८ व्या दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
राम चरण याचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटामधील त्याच्या अभिनयासाठी त्याला फिल्म फेअर बेस्ट साउथ डेब्युटेंट अवॉर्ड आणि नंदी स्पेशल ज्युरी अवॉर्ड देखील मिळाला होता. यानंतर रामचरणने कधीच मागे वळून बघितलं नाही...

Web Title: ram charan first ever audition video with shriya saran Ram Charan Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.