राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा RRR पाहून थिएटरमध्ये चाहते झाले क्रेझी, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:28 PM2022-03-25T20:28:46+5:302022-03-25T20:29:36+5:30

RRR या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Ram Charan and Junior NTR's RRR made fans go crazy in theaters, video goes viral | राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा RRR पाहून थिएटरमध्ये चाहते झाले क्रेझी, व्हिडीओ होतोय व्हायरल

राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा RRR पाहून थिएटरमध्ये चाहते झाले क्रेझी, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR Movie) या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट २५ मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटगृह हाऊसफुल्ल असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडिया यूजर्स चित्रपटाच्या अॅक्शन सीक्वेन्स आणि व्हीएफएक्सचे कौतुक करताना थकत नाहीत. त्याच वेळी, काही थिएटर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आले आहेत, जिथे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडिओ विरल भयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

विरल भियानी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये RRR हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी, चित्रपट पाहून चाहते इतके उत्तेजित दिसत आहेत की ते कागद आणि तिकिटांचे तुकडे उडवत आहेत. चाहत्यांची ही जबरदस्त क्रेझ पाहून त्यांना हा चित्रपट खूप आवडत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे रिव्ह्यूही चांगले येत आहेत.

या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राम चरणच्या लूकमध्ये चित्रपट पाहण्यासाठी अनेक चाहते आले आहेत. त्याचबरोबर ज्युनियर एनटीआरनेही चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. ज्युनियर एनटीआरने एक ट्विट केले असून या ट्विटमध्ये त्यांनी या अखंड प्रेमाबद्दल सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

RRR चे दिग्दर्शक एसएस राजामौली आहेत, ज्यांनी यापूर्वी बाहुबलीचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे बजेट सुमारे ४५० कोटी रुपये आहे. राम चरण आणि जूनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आलिया भट आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Ram Charan and Junior NTR's RRR made fans go crazy in theaters, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.