NCBच्या हाती लागले रिया चक्रवर्ती आणि रकुलप्रीत सिंगचे ड्रग्स चॅट, चौकशीत होऊ शकतात मोठे खुलासे

By गीतांजली | Updated: September 25, 2020 12:32 IST2020-09-25T12:12:25+5:302020-09-25T12:32:58+5:30

रकुल प्रीतचे ड्रग्स चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत.

Rakulpreet singh drug chat with rhea chakraborty ncb hopes big revealtion durin questioning | NCBच्या हाती लागले रिया चक्रवर्ती आणि रकुलप्रीत सिंगचे ड्रग्स चॅट, चौकशीत होऊ शकतात मोठे खुलासे

NCBच्या हाती लागले रिया चक्रवर्ती आणि रकुलप्रीत सिंगचे ड्रग्स चॅट, चौकशीत होऊ शकतात मोठे खुलासे

बॉलिवूडमध्ये ड्रग्सचे पसरलेले जाळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुळापासून काढून टाकण्याचे ठरवले आहे. एनसीबीच्या रडारवर सिनेइंडस्ट्रीतील 50 जण आहेत. काही नावानरुन पडद्या उठला आहे तर काही अजून ही गुलदस्त्यात आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची एनसीबीसमोर चौकशी सुरु आहे. 

एनसीबीच्या हाती रकुलचे ड्रग्स चॅट
आजतकच्या रिपोर्टनुसार रकुल प्रीतचे ड्रग्स चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. रकुलचे हे ड्रग्स चॅट रियासोबतचे आहेत. या चॅटनंतर रकुल एनसीबीच्या रडारवर आली आहे. याशिवाय रियाने आपल्या जबाबामध्ये रकुलचे नाव घेतले आहे. रकुल, सारा आणि श्रद्धा सुशांतच्या फार्म हाऊसवर जाऊन ड्रग्स पार्टी करायच्या असा जबाब रियाने दिला आहे. एनसीबीला अंदाज आहे की रकुलच्या चौकशीत मोठे खुलासे होऊ शकतात. 

रकुलनंतर एनसीबी दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी करणार आहे. दीपिका पादुकोण आणि करिश्माचे ड्रग्स संदर्भातले चॅटसमोर आले आहे.उद्या दीपिका पादुकोणला एनसीबी चौकशीला सामोऱ्य जावं लागणार आहे. 

रकुल प्रीत सिंगने हिंदी आणि साऊथमधील अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.साऊथमधील टॉप अभिनेत्यांसोबत रकुलने स्क्रिन शेअर केली आहे. रकुलने बॉलिवूडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगणसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे  काल रकुल हैदराबादवरुन मुंबईत आली आहे. रकुल हैदराबादमध्ये सिनेमाची शूटिंग करत होती. 

५० सेलिब्रिटींची यादी तयार
 ड्रग्जचे कनेक्शन मोठ्या पडद्याबरोबर छोट्या पडद्यावर पोहोचल्याचे आतापर्यंत अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांकडील चौकशीतून स्पष्ट झाले आहे. चित्रपट व टीव्हीवर काम करणाºया सुमारे ५० सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्मात्यांचा समावेश असून त्यांना टप्प्याटप्प्याने पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

'हिरोंची नावे समोर येणं बाकी' 
ड्रग्ज प्रकरणात रियाच्या अटकेनंतर आणखी बरीच बॉलिवुडसंबंधित नावे पुढे आली आहेत, परंतु विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त बॉलिवूड अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. याबाबत वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्न या प्रकरणात अद्याप बॉलिवूडच्या अभिनेत्यांची नावे उघड झाली नाहीत, आतापर्यंत केवळ अभिनेत्रींची नावे उघडकीस आली आहेत.

मुंबई एअरपोर्टवर मीडियाची गर्दी पाहून सारा अली खानची उडाली भंबेरी, लगेच केलं 'हे' काम...

 

Web Title: Rakulpreet singh drug chat with rhea chakraborty ncb hopes big revealtion durin questioning