राखी सावंतच्या ‘या’ फोटोंमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 15:30 IST2018-01-26T10:00:41+5:302018-01-26T15:30:41+5:30

बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करून खळबळ ...

Rakhi Sawant's 'These' photos caused a social upheaval on social media, see photo! | राखी सावंतच्या ‘या’ फोटोंमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ, पाहा फोटो!

राखी सावंतच्या ‘या’ फोटोंमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ, पाहा फोटो!

लिवूडमध्ये ड्रामा क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. फोटो बघून असे दिसत आहे की, राखी शूटिंग करीत असावी. मात्र त्यामध्ये तिने ज्यापद्धतीने आपल्या हॉट अदा दाखविल्या, त्यावरून सोशल मीडियावरिल वातावरण चांगलेच तापले आहे. राखीने तिचे हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 



वास्तविक राखीने पहिल्यांदाच अशाप्रकारचे फोटो शेअर केले असे नाही. तर यापूर्वी तिने तिचे अतिशय बोल्ड असे फोटो शेअर केले आहेत. बºयाचदा तर ती तिच्या या फोटोंवरून ट्रोलही झाली आहे. परंतु राखीवर त्याचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. उलट ती याकडे प्रसिद्धीचे साधन म्हणून बघत असून, सातत्याने अशाप्रकारचे फोटो शेअर करीत आहे. 



इन्स्टाग्रामवर राखीच्या फॉलोअर्सची संख्या सुमारे १८२,००० इतकी आहे. आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये बघावयास मिळालेल्या राखीला तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखले जाते. ३९ वर्षीय राखी तिच्या डान्स आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असते. त्यामुळे तिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन या नावानेही ओळखले जाते. 



काही दिवसांपूर्वीच राखी तिच्या कन्डोमच्या ब्रॅण्डमुळे चर्चेत आली होती. या ब्रॅण्डबद्दल तिने अनेक वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. परंतु राखीवर परिणाम होईल ती राखी कसली? असेच काहीसे यावेळी देखील बघावयास मिळाले. 

Web Title: Rakhi Sawant's 'These' photos caused a social upheaval on social media, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.