Video - राखी सावंतने केली मलायकाची नक्कल; उडवली चालण्याची खिल्ली अन् नंतर म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 18:13 IST2023-03-30T18:06:14+5:302023-03-30T18:13:21+5:30
Rakhi Sawant And Malaika Arora : राखी सावंत आता अभिनेत्री मलायका अरोराच्या चालण्याची नक्कल करताना दिसली.

Video - राखी सावंतने केली मलायकाची नक्कल; उडवली चालण्याची खिल्ली अन् नंतर म्हणाली...
ड्रामा क्वीन राखी सावंत डान्स आणि तिच्या बिनधास्त अंदाजामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आदिल खानसोबतच्या लग्नामुळे वादात सापडलेली राखी सावंत आता अभिनेत्री मलायका अरोराच्या चालण्याची नक्कल करताना दिसली. या कृतीने राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फोटोग्राफर समोर मलायका अरोरासारखे चालत राखीने लोकांना खूप हसवले. व्हिडिओमध्ये राखी चालताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी राखीने मलायकाला तिची फेव्हरेट असल्याचं म्हणत हे प्रकरण मिटवलं आहे.
राखी सावंतने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये राखी एका हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये दिसत आहे. मग ती तिच्या मागून आलेल्या फोटोग्राफर्सना विचारते- मलायकासारखं चालू का? त्यानंतर राखी मलायकाप्रमाणे कॅट वॉक करताना दिसली आणि फोटोग्राफर हसायला लागतात. यानंतर राखी मलायकाच्या स्टाईलमध्ये ओह माय गॉड म्हणताना दिसली. तसेच मलायका इज माय फेव्हरेट बाय द वे असंही सांगते.
राखीने मलायका अरोराच्या चालण्याची खिल्ली उडवली असेल, पण शेवटी तिने तिला आवडते म्हणत अभिनेत्रीला नाराज होण्याची संधी दिली नाही. हा व्हिडीओ खूप पाहिला जात असून लोक विविध कमेंट करत आहेत. काहींना राखीची ही मजेशीर स्टाईल आवडली आहे, तर काहींना राखीच्या या कृतीची चीड येत आहे. एका युजरने लिहिले की, 'राखी तू माझी आवडती आहेस आणि मलायकाही'. त्याचबरोबर एका युजरने लिहिले आहे की, 'हे फुल एंटरटेनमेंट आहे'. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"