‘काबिल-रईस’ बॉक्स आॅफिस क्लॅशमुळे राकेश रोशनचा पारा चढला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 20:39 IST2016-12-07T20:37:08+5:302016-12-07T20:39:57+5:30
हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘काबिल’ व शाहरुख खानचा ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होणार होते. मात्र ...

‘काबिल-रईस’ बॉक्स आॅफिस क्लॅशमुळे राकेश रोशनचा पारा चढला!
टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार राकेश रोशन यांनी शाहरुखच्या निर्णयावर टोमणा हाणला आहे. राकेश रोशन म्हणाले, ‘‘मला या गोष्टींचा आनंद आहे की, लोक माझ्या चित्रपट व्यवसायाशी निगडीत अनुभव आणि कुशाग्रतेचे अनुकरण करीत आहेत. राकेश म्हणाले, यावेळी मी आपल्या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या कामात खूप व्यस्त आहे आणि मी हा वाद आणखी वाढवू इच्छित नाही’’
डीएनए संके तस्थळावरील बातमीनुसार, राकेश रोशन यांनी शाहरुख खान व रईसच्या डिसीजनमकेर्सवर राग व्यक्त केला आहे. येथे प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार राकेश रोशन म्हणाले, आम्ही जी तारीख फायनल करीत आहोत त्याला ते फॉलो करीत आहेत. मी असे काम कधीच केले नाही, मी आपले 50 वर्ष या इंडस्ट्रीला दिले आहेत, आणि मी फिल्म स्कूलच्या जुण्या नियमांनुसार आजही काम करतो. मी कधीच आपला चित्रपट त्या तारखेला प्रदर्शित करणार नाही, ज्या तारखेची घोषणा आधिच करण्यात आली आहे. मी तर क्रिश 4 ची तारीख ख्रिसमस 2018 देखील बदलवून टाकली. कारण त्या दिवशी शाहरुखचा आणखी एक चित्रपट येतो आहे. मी माझा चित्रपट आरामशीरपणे बेफ्रिके किंवा दंगल सोबत रिलीज करू शकलो असतो. मात्र मला असे बॉक्स आॅफिस क्लॅश करायचे नव्हते. मी माझ्या चित्रपटाच्या रिलीजची तारीख 2016 मध्येच जाहीर केली होती कारण 26 जानेवारीच्या विकएंडला कोणताच चित्रपट प्रदर्शित होणार नव्हता.
काबिल व रईसची तारखेचा वाद आणखी वाढणार असल्याचे यावरून दिसू लागले आहे.