'क्रिश ४' का रखडला? राकेश रोशन यांनीच केला खुलासा; म्हणाले, "बजेट तसं असेल तरच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:59 IST2025-02-04T15:59:18+5:302025-02-04T15:59:37+5:30

'क्रिश ४' ची वाट पाहणाऱ्यांना राकेश रोशन यांनी दिलं उत्तर

rakesh roshan revealed why krrish 4 is not happening soon says budget is main problem | 'क्रिश ४' का रखडला? राकेश रोशन यांनीच केला खुलासा; म्हणाले, "बजेट तसं असेल तरच..."

'क्रिश ४' का रखडला? राकेश रोशन यांनीच केला खुलासा; म्हणाले, "बजेट तसं असेल तरच..."

अभिनेता हृतिक रोशन 'क्रिश' (Krrish) या सिनेमामुळेही ओळखला जातो. 'कोई मिल गया' सिनेमाचा सीक्वेल 'क्रिश' मध्ये त्याने सुपरहिरोची भूमिका साकारली. नंतर काही वर्षांनी क्रिश ३ ही आला जो फारसा चालला नाही. आता सर्वांनाच 'क्रिश ४' ची प्रतीक्षा आहे. पण हा सिनेमा नक्की का रखडला? यामागे आर्थिक अडचण हे कारण आहे का? या सर्व प्रश्नांवर दिग्दर्शक, निर्माते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी उत्तर दिलं आहे.

नुकतंच 'गलाटा प्लस'ला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन यांनी 'क्रिश ४' बाबत खुलासा केला. ते म्हणाले, "लोक कधीपासून क्रिश ४ ची वाट पाहत आहेत याची मला कल्पना आहे. पण अद्याप आम्ही सिनेमाचं नीट बजेट ठरवू शकलेलो नाही. हा सिनेमा बिग स्केलवर बनवायचा आहे. जर बजेट कमी करण्यासाठी मी सिनेमाची स्केल कमी करेन तर हा एक साधारणच सिनेमा होईल."

ते पुढे म्हणाले, "काळ बदलत चालला आहे. त्यामुळे 'क्रिश ४' बनवण्यात अनेक अडचणी येत आहेत. जग छोटं होत चाललं आहे. सध्या लहान मुलं अनेक प्रकारचे सुपरहिरोचे सिनेमे बघतात. अशात छोट्यातल्या छोट्या चुकाही लगेच पकडल्या जातात आणि मग त्यावरुन टीका होणार. म्हणून आम्हालाही बरीच सावधगिरी बाळगावी लागणार आहे."

राकेश रोशन आणखी समजावत म्हणाले, "हॉलिवूडच्या sci-fi सिनेमाच्या तुलनेत भारतीय सिनेमांचं बजेट कमी असतं. अशा स्तरावरील टेक्नॉलॉजीवर काम केल्यावरही बजेट वाढतं. भारतीयांजवळ आंतरराष्ट्रीय सुपरहिरो ड्रामासारखं बजेट नाही. आपण त्या स्तरावरील सिनेमे बनवू शकत नाही. मी हे नक्की सांगतो की क्रिश ४ मध्ये हाय ऑक्टेन सीक्वेन्स असतील. पण कदाचित १० ऐवजी २-३ च असतील."

Web Title: rakesh roshan revealed why krrish 4 is not happening soon says budget is main problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.