राजपाल यादवपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे त्याची पत्नी, हाइट बघाल तर दंग व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 15:22 IST2017-09-27T09:50:35+5:302017-09-27T15:22:32+5:30
अभिनेता राजपाल यादव लवकरच आगामी ‘जुडवा-२’मध्ये बघावयास मिळणार आहे. कॉमिक अंदाजासाठी ओळखल्या जाणाºया राजपालच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९९ मध्ये ...

राजपाल यादवपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे त्याची पत्नी, हाइट बघाल तर दंग व्हाल!
अ िनेता राजपाल यादव लवकरच आगामी ‘जुडवा-२’मध्ये बघावयास मिळणार आहे. कॉमिक अंदाजासाठी ओळखल्या जाणाºया राजपालच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९९ मध्ये आलेल्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून झाली. चित्रपटात मोठी भूमिका न मिळताही त्याने छोट्या-छोट्या भूमिका साकारून स्वत:ची ओळख निर्माण केली. शिवाय बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान बळकट बनविले. राजपालच्या पर्सनल लाइफविषयी सांगायचे झाल्यास त्याची फॅमिली लाइमलाइटपासून दूर आहे. त्यामुळेच त्याच्या पर्सनल लाइफविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला त्याच्या पर्सनल लाइफविषयी सांगणार आहोत.
![]()
![]()
राजपालची पत्नी राधा त्याच्यापेक्षा जवळपास नऊ वर्षांनी लहान आहे. याबाबतचा खुलासा स्वत: राजपालनेच एका मुलाखतीदरम्यान केला होता. ५.२ फूट एवढी उंची असलेल्या राजपालचे राधाबरोबर लव्ह मॅरेज झाले आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘लोकांना असे वाटते की, ती माझ्यापेक्षा खूपच उंच आहे. परंतु वास्तविकता ही आहे की, ती माझ्यापेक्षा केवळ एका इंचाने मोठी आहे. म्हणजेच माझी उंची ५.२ फूट तर तिची उंची ५.३ इंच असल्याचे त्याने सांगितले.
![]()
![]()
![]()
२००२ मध्ये राजपाल त्याच्या ‘द हिरो : लव्ह स्टोरी आॅफ स्पाय’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कॅनडाला गेला होता. त्याठिकाणीच दोघांच्या कॉमन फ्रेंडने त्यांची भेट घडवून आणली होती. दोघांची भेट कॅनडा शहरातील एका कॉफी शॉपमध्ये झाली होती. या भेटीत दोघांनीही एकमेकांच्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफविषयी माहिती शेअर केली. याठिकाणी तब्बल दहा दिवस या दोघांनी एकत्र घालविले. पुढे त्यांच्यात प्रेम झाले. पुढे राजपाल भारतात परतला. मात्र अशातही दोघांमधील प्रेम कायम राहिले. दोघे फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.
![]()
![]()
![]()
जवळपास दहा महिने फोनवर कनेक्ट राहिल्यानंतर राधाने भारतात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. भारतात शिफ्ट झाल्यानंतर १० जून २००३ मध्ये दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. सध्या या दाम्पत्याला दोन मुली आहेत. राजपालची मोठी मुलगी मौनी १३ वर्षांची आहे तर लहान मुलगी हनी ३ वर्षांची आहे. राजपाल नेहमीच त्याच्या मुलींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत असतो. काही दिवसांपूर्वीच राजपालची लहान मुलगी हनी ‘जुडवा-२’च्या सेटवर पोहोचली होती.