अखेर राजकुमार राव-पत्रलेखाने 'गुड न्यूज' सांगितलीच! सोशल मीडियावर केली 'ही' मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:39 IST2025-01-31T18:38:58+5:302025-01-31T18:39:39+5:30
राजकुमार राव आणि पत्रलेखाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना खास आनंदाची बातमी दिलीय (rajkumar rao, patralekha)

अखेर राजकुमार राव-पत्रलेखाने 'गुड न्यूज' सांगितलीच! सोशल मीडियावर केली 'ही' मोठी घोषणा
राजकुमार राव आणि पत्रलेखा हे बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल. राजकुमार रावला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय राजकुमारची बायको पत्रलेखाही अभिनेत्री आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. अशातच राजकुमार- पत्रलेखाने काल सोशल मीडियावर सर्वांना ते आज एक आनंदाची बातमी जाहीर करणार असं सांगितलं होतं. अखेर काहीच तासांपूर्वी राजकुमार-पत्रलेखाने गुड न्यूजचा खुलासा केला.
राजकुमार-पत्रलेखाने दिली आनंदाची बातमी
राजकुमार राव - पत्रलेखाने काल आनंदाची बातमी कोणती याचा खुलासा करताच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांना वाटलं की, राजकुमार - पत्रलेखा आई-बाबा होणार असून त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार की काय. पण असं काही नाहीये. राजकुमार-पत्रलेखाने स्वतःचं प्रॉडक्शन हाउस सुरु केलंय. कॅम्पा फिल्म्स हे राजकुमार-पत्रलेखाच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. दोघांनी सोशल मीडियावर कॅम्पा फिल्म्सचा खास व्हिडीओ शेअर करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. या प्रॉडक्शन हाउसचा पहिला प्रोजेक्ट लवकरच रिलीज होणार आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता अलिकडेच तृप्ती डीमरीसोबत 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तर त्याआधी तो श्रद्धा कपूरसोबत 'स्त्री २'मध्येही झळकला होता. तर पत्रलेखा ही गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'IC 814 कंदहार हायजॅक' या वेबसीरिजमध्ये दिसली. याशिवाय ती प्रतीक गांधी याच्यासोबत 'फुले' या हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. यात ती सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.