Rajkummar Rao : राजकुमार रावने खरेदी केलं जान्हवी कपूरचं घर, किंमत वाचून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:43 IST2022-07-30T14:42:36+5:302022-07-30T14:43:18+5:30
Rajkummar Rao buys Janhvi Kapoor’s luxury apartment : राजकुमारने स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. यासाठी अपार कष्ट घेतले. आता मुंबईत घर घेण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

Rajkummar Rao : राजकुमार रावने खरेदी केलं जान्हवी कपूरचं घर, किंमत वाचून थक्क व्हाल
राजकुमार राव (Rajkummar Rao ) हा बॉलिवूडचा गुणी अभिनेता. राजकुमारने स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. यासाठी अपार कष्ट घेतले. अगदी पार्लेची बिस्किटं खाऊन दिवस काढले. आज हाच राजकुमार बॉलिवूडचा स्टार झाला आहे. आता तर मुंबईत घर घेण्याचं त्याचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. होय, त्याने मायानगरीत स्वत:चं घर खरेदी केलं आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरचं (Janhvi Kapoor) एक लक्झरी अपार्टमेंट राजकुमारने खरेदी केलं आहे. जुहू भागातील हे अपार्टमेंट जान्हवीने राजकुमारला 44 कोटी रूपयांत विकल्याचं कळतंय. 3456 स्क्वेअर फूटाच्सं हे घर जान्हवीने डिसेंबर 2020मध्ये खरेदी केलं होतं. इतक्या कमी वयात कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी खरेदी करून जान्हवी चर्चेत आली होती. आता तिने हेच अपार्टमेंट राजकुमार व त्याची पत्नी पत्रलेखाला विकलं आहे. राजकुमार पत्नी पत्रलेखासोबत लवकरच या घरात शिफ्ट होणार आहे.
हे घर 14,15 आणि 16 व्या मजल्यावर आहे. या अपार्टमेंट सोबतच सहा पार्किंग स्लॉट देखील आहेत. रिर्पोनुसार, जान्हवी व राजकुमार यांच्यातील खरेदी-विक्री व्यवहार 31 मार्चला फायनल झाला होता. 21 जुलै 2022 रोजी या घराची रजिस्ट्री झाली. यासाठी राजकुमारने 2.19 कोटींची स्टँप ड्युटी भरली आहे. जान्हवीने त्यावेळी स्टँप ड्युटीपोटी 78 लाख रूपये दिले होते.
गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड स्टार्सने नवी प्रॉपर्टी खरेदी केली. रणवीर सिंग वांद्रे भागात नवा बंगला खरेदी केला आहे. त्याच्या बंगल्याची किंमत जवळपास 119 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री काजोलने देखील मुंबईत दोन नवे फ्लॅट खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे काजोलने खरेदी केलेले हे फ्लॅट राजकुमार राव राहात असलेल्या बिल्डिंगमध्ये आहेत.