​राजकुमार रावच्या ‘ट्रॅप्ड’चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 20:50 IST2017-02-22T15:11:07+5:302017-02-22T20:50:59+5:30

या चित्रपटाची कथा एका मानसावर आधारित असून तो मुंबईतील एका इमारतीमध्ये अडकला असून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहे.

Rajkumar Rao's Trapped Trailer Release | ​राजकुमार रावच्या ‘ट्रॅप्ड’चा ट्रेलर रिलीज

​राजकुमार रावच्या ‘ट्रॅप्ड’चा ट्रेलर रिलीज

लिवूड अभिनेता राजकुमार राव आपल्या जिवंत अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या आगामी ‘ट्रॅप्ड’ या चित्रपटातून तो पुन्हा एकादा आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘ट्रॅप्ड’चा ट्रेलर पाहिल्यावर या चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी नवे पाहायला मिळू शकते असा अंदाज लावता येतो. 

राजकुमार राव याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट थ्रिलर ड्रामा असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाची कथा एका मानसावर आधारित असून तो मुंबईतील एका इमारतीमध्ये अडकला आहे. त्या आपल्या खोलीतून बाहेर पडायचे आहे. यासाठी त्याने प्रयत्न चालविले आहे. मात्र चावी बाहेरून दाराला लावून असल्याने  तो स्वत:ची सुटका करू शकत नाही. बाहेरून कुणीतरी मदतीला येईल या आशेने तो अनेक शकली लढवितो, मात्र त्याच्याक डे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. त्याचे पूर्ण प्रयत्न अयशस्वी ठरतात.या दरम्यान तो आपल्या जीवनात घडलेल्या गोष्टींचा मागोवा घेतो.  असा अंदाज ट्रॅप्डचा ट्रेलर पाहिल्यावर लावता येतो. २ मिनीट १८ सेंकदाच्या ट्रेलरहून या चित्रपटाच्या क थेचा अंदाज लावणे कठीण आहे. 



ट्रॅप्डचा ट्रेलर रिलीज झाल्यावर काही तासातच तो चांगलाच व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी तो पाहिला असून ट्विटरवर ट्रॅप्ड ट्रेलर या हॅशटॅगने ट्रेन्ड झाला. राजकुमार रावचे फॅन्स या चित्रपटासंबंधीत पोस्टर्स व फोटो मागील काही दिवसांपासून शेअर करीत होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असल्याने या चित्रपटाक डून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. फॅटम फिल्म प्रोडक्शन निर्मित व विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित हा चित्रपट १७ मार्चला रिलीज केला जाणार आहे. यापूर्वी विक्रमादित्यने ‘लूटेरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

Web Title: Rajkumar Rao's Trapped Trailer Release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.