'बरेली की बर्फी'मुळे राजकुमार रावची ही इच्छा झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 14:59 IST2017-08-11T05:49:02+5:302017-08-15T14:59:27+5:30

भारतीय चित्रपटात चौकटीच्या बाहेरील भूमिका करणारे म्हणून ओळखले जाणारे राजकुमार राव यांना एक मसालेदार चित्रपट करायची इच्छा होती आणि ...

Rajkumar Rao's desire for 'Bareilly Ki Barfi' was fulfilled | 'बरेली की बर्फी'मुळे राजकुमार रावची ही इच्छा झाली पूर्ण

'बरेली की बर्फी'मुळे राजकुमार रावची ही इच्छा झाली पूर्ण

रतीय चित्रपटात चौकटीच्या बाहेरील भूमिका करणारे म्हणून ओळखले जाणारे राजकुमार राव यांना एक मसालेदार चित्रपट करायची इच्छा होती आणि ती आता पूर्ण झाली आहे. त्याचा आगामी चित्रपट 'बरेली की बर्फी'मध्ये तो आयुषमान खुराना आणि क्रिती सॅनन बरोबर डान्स करताना दिसणार आहे. राव याला डान्स करायला खूप आवडतो. आयुषमान आणि क्रितीला आपण याआधी डान्स करताना पाहिले आहेच पण रावसाठी हा एक नवीन अनुभव होता.

या चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या वेळेस दिलेल्या  घेतलेल्या मुलाखतीत राव म्हणाले "मी डान्स करायला घाबरत नाही मी लहानपणी भरपूर डान्स करायचो आणि त्यामुळेच मी स्टेजवर आलो पण जेव्हा मी अॅक्टिंगकडे वळलो तेव्हा मात्र डान्स कमी झाला पण मी विसरलो नाही. तो पुढे म्हणाले "तुम्ही डान्सर असाल तर नेहमीच डान्स करत असता पण लोकांना मला पाहून आश्चर्य वाटते "अरे हा डान्स पण करतो?"
राव बद्धल क्रितीला विचारले असता ती म्हणाली "तो खूप सुंदर डान्स करतो तुम्ही गाण्यात बघितलेच असेल की तो  बेफिकीर होऊन नाचतो आणि त्यांने गाणंपण भरपूर एन्जॉय केले आहे" 

ALSO READ :  ​क्रिती सॅनन पडली श्रद्धा कपूरवर भारी!

या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.रिलीजच्या पाच दिवसांत हा ट्रेलर सुमारे 60 लाख लोकांनी पाहिला. अश्विनी अय्यर दिग्दर्शित 'बरेली की बर्फी' 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा एक छोट्या शहरातल्या धाडसी मुलीशी निगडीत आहे. 

Web Title: Rajkumar Rao's desire for 'Bareilly Ki Barfi' was fulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.