"आमच्या आयुष्यातला सर्वोत्तम टप्पा...", बाबा होण्यावर राजकुमार रावने व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:54 IST2025-07-10T16:52:53+5:302025-07-10T16:54:31+5:30

लग्नानंतर ४ वर्षांनी कपलने गुडन्यूज दिली आहे. काय म्हणाला राजकुमार?

rajkumar rao and patralekha soon to be parents actor shared his excitement | "आमच्या आयुष्यातला सर्वोत्तम टप्पा...", बाबा होण्यावर राजकुमार रावने व्यक्त केला आनंद

"आमच्या आयुष्यातला सर्वोत्तम टप्पा...", बाबा होण्यावर राजकुमार रावने व्यक्त केला आनंद

बॉलिवूडमधलं क्युट कपल राजकुमार राव (Rajkumar Rao)  आणि पत्रलेखा (Patralekha) आई बाबा होणार आहेत. लग्नानंतर ४ वर्षांनी कपलने गुडन्यूज दिली आहे. कालच दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुडन्यूज शेअर केली. या घोषणेनंतर राजकुमारने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. दोघंही न्यूझीलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन आले. ही ट्रीप फक्त दोघांची नसून येणारा पाहुणाही सोबत असल्याने आणखी स्पेशल आहे असं राजकुमार म्हणाला.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी पाळणा हलणार आहे. लवकरच त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. काल दोघांनी सोशल मीडियावर गुडन्यूज शेअर केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. तर आता दोघंही एका इव्हेंटसाठी आले. पत्रलेखा फॉर्मल लूकमध्ये दिसली. तिने ओव्हरकोट परिधान करत बेबी बंप लपवला होता. तर राजकुमार सूट बूट परिधान करुन स्टायलिश दिसत होता. 

नुकतंच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार म्हणाला, "आम्ही खूप जास्त आनंदात आहोत. आमचे अनेक मित्र जे पालक आहेत ते आम्हाला सांगतात की हा तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम टप्पा असणार आहे. त्यामुळे आम्हीही हा टप्पा अनुभवण्यासाठी आतुर आहोत. सध्या अजूनही आम्ही ही गुडन्यूज प्रोसेस करत आहोत."

तो पुढे म्हणाला, "प्रत्येक दिवस हा नवा असतो. आम्ही गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की काय, हे खरंच घडतंय? आम्ही आईबाबा होणार आहोत. ही खूप सुंदर भावना आहे."

Web Title: rajkumar rao and patralekha soon to be parents actor shared his excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.