पायाला दुखापत झाल्यानंतर ही राजकुमार राव करतोय 'शादी मैं जरुर आना'चे प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 17:11 IST2017-10-31T11:39:50+5:302017-10-31T17:11:00+5:30

नुकताच राजकुमार रावला लिप सिंग बैटल शोच्या रिहर्सल दरम्यान दुखापत झाली होती. डान्सची रिहर्सल करताना राजकुमारचा पाय फैक्चर झाला ...

Rajkumar Rao, after the injuries to the leg, is promoting the marriage of 'Jahir Mein Aana' | पायाला दुखापत झाल्यानंतर ही राजकुमार राव करतोय 'शादी मैं जरुर आना'चे प्रमोशन

पायाला दुखापत झाल्यानंतर ही राजकुमार राव करतोय 'शादी मैं जरुर आना'चे प्रमोशन

कताच राजकुमार रावला लिप सिंग बैटल शोच्या रिहर्सल दरम्यान दुखापत झाली होती. डान्सची रिहर्सल करताना राजकुमारचा पाय फैक्चर झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. पायाला दुखापत होऊन सुद्धा राजकुमार राव आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला लागला आहे. सध्या राजकुमार शादी मैं जरुर आना चित्रपटाचे प्रमोशन करतो आहे. यात राजकुमार रावसोबत कृति खरबंदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक कुटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रत्ना सिन्हाने केले आहे तर निर्मिती विनोद बच्चनने. ही एक लव्हस्टोरी आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायाला फैक्चर झाल्यानंतर राजकुमारची सर्जरी करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्याला आराम करायला सांगितले होते. मात्र चित्रपटाचे प्रमोशन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे आजारी असताना ही त्यांने चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली.  

याबाबत राजकुमार रावने सांगितले की, ''माझी शादी मैं जरुर आना या चित्रपटाला घेऊन असणारी कमिटमेंट मला पूर्ण करायची आहे. मी डॉक्टरांनी दिलेला सल्ल्याचे पालन करतोच आहे मात्र त्यासोबत चित्रपटाचे प्रमोशन देखील मला करायचे आहे.''  

कृति याआधी गेस्ट इन लंडन चित्रपटात झळकली होती. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. राजकुमार यात सत्येंद्र उर्फ सत्तूची भूमिका साकारतो आहे तर कृति यात आरती नावाच्या मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. छोट्याशा गावात राहणाऱ्या आरतीच्या लग्नाची गोष्ट चालू असते आणि याच दरम्यान ती प्रेमात पडते. लग्नाच्या आधी आरती घरातून पळून जाते अशी या चित्रपटाची कथा आहे. 10 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच राजकुमारचा न्यूटन चित्रपटाने ऑस्करमध्ये एंट्री घेतली आहे. यात तो गंभीर भूमिकेत दिसला होता तर शादी मैं जरुर आना चित्रपटात तो रोमांस करताना दिसणार आहे. आरतीने राज रीबूट नावाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटाची कथा आरतीला इतकी आवडली कि तिने मानधनावर देखील चर्चा केली नाही.   

ALSO RAED : आॅस्करसाठी निवडलेल्या ‘न्यूटन’च्या शूटिंगदरम्यान झाले होते राजकुमार रावच्या आईचे निधन!

Web Title: Rajkumar Rao, after the injuries to the leg, is promoting the marriage of 'Jahir Mein Aana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.