१३ व्या वर्षी रजनीकांत यांच्या आईची भूमिका!असा राहिला श्रीदेवी यांचा ५० वर्षांचा प्रवास...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 10:33 IST2018-02-25T05:03:02+5:302018-02-25T10:33:02+5:30
श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांचे असे जाणे सगळ्यांनाच चटका लावून जाणारे आहे. श्रीदेवींच्या आयुष्याची उणीपुरी ...

१३ व्या वर्षी रजनीकांत यांच्या आईची भूमिका!असा राहिला श्रीदेवी यांचा ५० वर्षांचा प्रवास...!!
श रीदेवी यांच्या अकाली निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांचे असे जाणे सगळ्यांनाच चटका लावून जाणारे आहे. श्रीदेवींच्या आयुष्याची उणीपुरी ५० वर्षे बॉलिवूडला समर्पित राहिलीत. केवळ वयाच्या चौथ्या वर्षी श्रीदेवी पहिल्यांदा कॅमे-यापुढे उभ्या राहिल्या आणि पुढे बॉलिवूडला त्यांनी अनेक हिट चित्रपटांचा नजराना दिला. म्हणूनच श्रीदेवींना हिंदी चित्रपटांच्या पहिल्या सुपरस्टार म्हटले जाते.
![]()
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी श्रीदेवींनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता ‘जुली.’ या चित्रपटात श्रीदेवी बालकलाकार म्हणून दिसल्या होत्या. यात त्यांनी लक्ष्मीच्या लहान बहीणीची भूमिका साकारली होती. पुढे १९७९ साली हिरोईन म्हणून बॉलिवूडमध्ये श्रीदेवींनी डेब्यू केला. त्यांच्या या चित्रपटाचे नाव होते,‘सोलवां सावन’. यानंतर १९८३मध्ये ‘हिम्मतवाला’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या.
![]()
श्रीदेवी यांनी तामिळमध्ये सर्वाधिक चित्रपट कमल हासन आणि रजनीकांत यांच्यासोबत तर तेलगूमध्ये कृष्णा, एनटीआर आणि शोभन बाबू यांच्यासोबत केलेत. १३ व्या वर्षी ‘मूंडरू मुदिछु’ या तामिळ चित्रपटात त्यांनी रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट खरे तर हिरोईन म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. याच चित्रपटात श्रीदेवींनी प्रथम कमल हासन व रजनीकांत या दोघांसोबत एकत्र काम केले होते. बालचंदर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
![]()
‘हिम्मतवाला’‘सदमा’, ‘नागिन’, ‘निगाहें’,‘मिस्टर इंडिया’, ‘चालबाज’, ‘लम्हे’, ‘खुदा गवाह’, ‘जुदाई’ , ‘जाग उठा इंसान’, ‘सरफरोश’, ‘बलिदान’,‘नया कदम’, ‘नगीना’,‘घर संसार’, ‘मकसद’, ‘सुल्तान’, ‘आग और शोला’, ‘भगवान’, ‘आखरी रास्ता’,‘ वतन के रखवाले’, ‘जवाब हम देंगे’, ‘औलाद’, ‘नजराना’,‘हिम्मत और मेहनत’, ‘मिस्टर इंडिया’, ‘निगाहें’, ‘हीर रांझा’, ‘चांदनी’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘चंद्रमुखी’, ‘चांद का टुकड़ा’, ‘गुमराह’, ‘लाडला’, ‘आमीर्’, ‘जुदाई’, ‘हल्ला बोल’, ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘ मॉम’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले.
![]()
ALSO READ : -आणि श्रीदेवींच्या आयुष्यात बोनी कपूर आलेत!
बॉलिवूडमध्ये ‘हिम्मतवाला’ या चित्रपटाने श्रीदेवींना रातोरात स्टार बनवले. यानंतर १९८९ मध्ये आलेल्या ‘चालबाज’या चित्रपटात श्रीदेवी यांनी डबल रोल साकारला होता. या अभिनयाबद्दल त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
१९९१ मध्ये यशराज बॅनरच्या ‘लम्हे’मध्ये या चित्रपटाने त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. १९९६ मध्ये बोनी यांच्यासोबत विवाहबंधनात अडल्यानंतर चित्रपटापासून दूर गेल्या होत्या. यानंतर १६ वर्षांनी म्हणजे, २०१२ मध्य ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाद्वारे त्यांनी पुनरागमन केले होते.