रजनीकांत यांचा ‘काला’ प्रदर्शित! पहाटे चारच्या शोला तुफान गर्दी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 10:54 IST2018-06-07T05:24:31+5:302018-06-07T10:54:31+5:30

रजनीकांत हेच दाक्षिणात्य चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे अनभिषिक्त सम्राट आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. होय, अनेक वादानंतर रजनीकांत ...

Rajinikanth's 'black' displayed! Tornado rises in the morning! | रजनीकांत यांचा ‘काला’ प्रदर्शित! पहाटे चारच्या शोला तुफान गर्दी!!

रजनीकांत यांचा ‘काला’ प्रदर्शित! पहाटे चारच्या शोला तुफान गर्दी!!

नीकांत हेच दाक्षिणात्य चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे अनभिषिक्त सम्राट आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. होय, अनेक वादानंतर रजनीकांत यांचा ‘काला’ हा चित्रपट आज शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्यात. चाहत्यांचा उत्साह इतका दांडगा की, चेन्नईतील रोहिनी या चित्रपटगृहात पहाटे चारचा पहिला शो ठेवला गेला अन् हा पहाटेचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली.



प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या सुपरस्टारचा पहिला शो पाहू इच्छित होता. त्यामुळे पहाटेपासून चेन्नईतल्या अनेक चित्रपटगृहांसमोरचे चित्र पाहण्यााररखे होते. चित्रपटगृहांच्या आतही रजनींचे चाहते नृत्य करताना आणि रजनींच्या प्रत्येक संवादावर टाळ्या आणि शिट्या मारताना दिसले.



‘काला’ रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाचे सर्वच्या सर्व शो हाऊसफुल झाले आहेत. देशविदेशातील रजनींच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज पाहायला मिळत आहे. तामिळनाडूत चाहत्यांनी रजनीकांत यांच्या पोस्टरला दूधाने अभिषेक घातला.



फटाक्यांची आतीषबाजी केली़ रस्त्यांना असे सजवले जणू दिवाळी असावी. अर्थात हे पहिल्यांदा नाही़ रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दाक्षिणेत असे चित्र पाहायला मिळते.
याआधी ‘काला’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. बुधवारी न्यायालायने याचिका फेटाळल्याने चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. के.एस. राजशेखरन यांनी काला सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यास सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने यास नकार दिला आहे. याचिकाकर्त्याने 'काला' सिनेमातील गाणी आणि काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने सांगितले की, तुम्ही सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करत आहात, मात्र प्रत्येक सिनेरसिक सिनेमा पाहण्यास आतुर आहे.  

ALSO READ : Kaala Trailer : काला दादाची सीटीमार डायलॉगने एंट्री; धारावीचे ‘मसीहा’ बनले रजनीकांत!

Web Title: Rajinikanth's 'black' displayed! Tornado rises in the morning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.