रजनीकांतच्या हातून मार खायला आवडेल - अक्षय कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:34 IST2016-01-16T01:05:32+5:302016-01-24T16:34:43+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार रजनीकांतशी 'रोबोट २'मध्ये दोन हात करताना दिसणार आहे. आता रजनीकांतीशी फाईट करायची म्हणजे भल्याभल्यांना घाम सुटतो, ...

रजनीकांतच्या हातून मार खायला आवडेल - अक्षय कुमार
ब लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार रजनीकांतशी 'रोबोट २'मध्ये दोन हात करताना दिसणार आहे. आता रजनीकांतीशी फाईट करायची म्हणजे भल्याभल्यांना घाम सुटतो, तर मग अक्षयला काय वाटत असेल? तो म्हणतो, 'रजनी सरांच्या हातचा मार खाणे माझ्यासाठी अभिमानाची बाब ठरेल. ते केवळ सूपरस्टार नाहीत तर सूपर ह्युमनदेखील आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळतेय म्हटल्यावर मी खूप खूश आहे.' सर्वप्रथम रजनीकांतला पडद्यावर पाहण्याची आठवण सांगताना अक्षय म्हणाला, '१९८३ साली 'अंधा कानून' चित्रपटात मी त्यांना पाहिले होते. त्यांची स्टाईल, अँक्शन पाहून मी फॅनच झालो. आज जरी ते सर्व मजेशीर वाटत असले तरी रजनी सर म्हणजे माझ्यासाठी खरे अँक्शन हीरो होते. एके दिवशी त्यांच्यासोबत काम करायला मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता.' 'रोबोट २'मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी आर्नोल्ड श्वार्झनेगरला विचारणा करण्यात आल्याच्या बातमीबद्दल तो म्हणतो, 'याविषयी मला काही माहिती नाही. दिग्दर्शक शंकरने मला फोन केला आणि चित्रपटाची माहिती दिली.