रजनीकांत-विद्या बालन दिसणार एकाच चित्रपटात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 21:22 IST2017-02-22T15:52:58+5:302017-02-22T21:22:58+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या व दिग्दर्शक पा रंजित यांच्या ‘कबाली’ या चित्रपटाच्या स्पिन आॅफला सुरुवात झाली ...

रजनीकांत-विद्या बालन दिसणार एकाच चित्रपटात !
द क्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या व दिग्दर्शक पा रंजित यांच्या ‘कबाली’ या चित्रपटाच्या स्पिन आॅफला सुरुवात झाली आहे. असे सांगण्यात येते की या चित्रपटात रजनीकांतच्या अपोझिट बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिची निवड करण्यात आली आहे. असेही सांगण्यात येते क ी, सध्या निर्माते या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा फिक्स करण्यासाठी बोलणी करीत आहेत. विद्याने या चित्रपट केल्यास ती पहिल्यांदा रजनीकांतसोबत मोठ्या पडद्यावर दिसेल, सोबतच तिचा तामिळ चित्रपटसृष्टीतील डेब्यू चित्रपट ठरणार आहे.
कबालीच्या स्पिन आॅफचे टायटल अद्याप ठ रविण्यात आले नाही. मात्र हा चित्रपट अनेक गोष्टींसाठी खास ठरणार आहे. कारण या चित्रपटाची निर्मिती रजनीकांत सोबतच त्यांचा जावाई धनूष करणार आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारी पा रंजित यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पा रंजित याचा रजनीकांतसोबत हा दुसरा चित्रपट असेल. या चित्रपटाची निर्मिती वंडरबार या धनूषच्या होम प्रोडक्शनमध्ये होणार आहे. विद्या बालन सध्या आपल्या आगामी बेगम जान या चित्रपटाच्या पोस्ट प्रोेडक्शनच्या कामात व्यस्त आहे. कबालीच्या पहिल्या भागात रजनीकांतच्या अपोझिट बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिने भूमिका साकारली होती.
![]()
असे सांगण्यात येते की, दिग्दर्शक रंजित याने कबालीच्या स्पिन आॅफची कथा सर्वांत आधी धनूषला सांगितली होती. त्याचवेळी धनूषने होकार दिला होता. रजनीकांतच्या कबालीने भारतात २११ कोटींचा गल्ला जमविला होता तर विदेशात सुमारे २५९ कोटी रुपयांची कमाई केली होती. कबालीचे म्युझिक व सॅटेलाईट राईट्सच्या विक्रीतून २०० कोटींची कमाई करण्यात आली होती. हा चित्रपट कधी फ्लोरवर येईल हे अद्याप ठरले नाही. रजनीकांत सध्या एस. शंकर यांच्या आगामी २.० या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहेत. रजनीकांतसह अक्षय कुमार व एमी जॅक्सन यांच्या भूमिका असणारा २.० हा चित्रपट दिवाळीत रिलीज होणार आहे.