रजनीकांत यांचे घरी आल्यानंतर अशाप्रकारे केले त्यांच्या पत्नीने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:22 IST2020-12-28T17:19:56+5:302020-12-28T17:22:54+5:30

घरी परतल्यानंतर रजनीकांत यांच्या पत्नीने त्यांचे खूपच चांगल्याप्रकारे स्वागत केले.

Rajinikanth Gets Warm Welcome at Home from Wife Latha After Hospital Discharge, See Pic | रजनीकांत यांचे घरी आल्यानंतर अशाप्रकारे केले त्यांच्या पत्नीने स्वागत

रजनीकांत यांचे घरी आल्यानंतर अशाप्रकारे केले त्यांच्या पत्नीने स्वागत

ठळक मुद्देरजनीकांत यांची पत्नी लता यांनी घरी आल्यानंतर त्यांचे औक्षण केले. त्यांच्या पत्नीने त्यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला आणि त्यांची आरती ओवाळली.

दाक्षिणात्य आणि बॉलिवूडचे सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत अचानक शुक्रवारी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर आता रविवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. घरी परतल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांचे खूपच चांगल्याप्रकारे स्वागत केले.

रजनीकांत यांची पत्नी लता यांनी घरी आल्यानंतर त्यांचे औक्षण केले. त्यांच्या पत्नीने त्यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला आणि त्यांची आरती ओवाळली. रजनीकांत हैद्राबादवरून थेट चेन्नईला त्यांच्या घरी आले आहेत. रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे चाहते चिंतेत पडले होते. त्यांचे तब्येत बरी व्हावी यासाठी त्यांचे देशभरातले फॅन्स प्रार्थना करत होते. रजनीकांत बरे झाल्यामुळे आता त्यांचे चाहते खूश झाले आहेत. 

रजनीकांत यांचा चित्रपट अन्नाथेच्या शूटिंग सेटवर काही दिवसांपूर्वी काही लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. रजनीकांत यांची २२ डिसेंबर रोजी कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. पण ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. पण त्यांची तब्येत शुक्रवारी अचानक खराब झाली होती. रजनीकांत यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसली नव्हती. त्यांच्या ब्लड प्रेशरमध्ये चढउतार होत होता. त्यासाठी त्यांनी औषधे दिली गेली होती अशी माहिती अपोलो रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिली होती. रजनीकांत यांच्यासोबत त्यांची मुलगी सौंदर्या रुग्णालयात उपस्थित होती.

Web Title: Rajinikanth Gets Warm Welcome at Home from Wife Latha After Hospital Discharge, See Pic