विमानतळावर दिसले रजनीकांत, अन् मग चाहत्यांनी जे केलं ते पाहून सर्वच जण आश्चर्यचकित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 02:43 PM2023-09-18T14:43:53+5:302023-09-18T14:45:35+5:30

सुपरस्टार रजनीकांत यांना कोईम्बतूर विमानतळावर चाहत्यांनी गराडा घातला.

Rajinikanth draws massive crowd of fans at Coimbatore airport | विमानतळावर दिसले रजनीकांत, अन् मग चाहत्यांनी जे केलं ते पाहून सर्वच जण आश्चर्यचकित

rajinikanth

googlenewsNext

सुपरस्टार रजनीकांत कायमच चर्चेत असतात.   त्यांचा 'जेलर' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलाय. या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. अलीकडेच ते कोईम्बतूर विमानतळावर दिसले, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.


व्हिडीओमध्ये रजनीकांत काळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. विमानतळावर ते दिसताच चाहत्यांच्या जमावाने त्यांना घेरले. सेल्फीसाठी काही चाहते तर त्यांच्या कारवरही चढले. त्याचवेळी रजनीकांतसोबत अनेकांनी फोटो क्लिक केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.काही वेळा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून आले. रजनीकांत यांना चाहत्यांनी किती वेठीस धरले आहे, हे यावरून दिसून येते.


72 वर्षीय रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 10 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे सुपरस्टार दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, मोहनलाल, रम्या कृष्णन, प्रियांका अरुल मोहन, शिवा राजकुमार योगी बाबू, वसंत रवी आणि विनायकन यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार आहेत.


रजनीकांत लवकरच आगामी दोन नवीन चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. रजनीकांत प्रथम 'थलैवा 170' ची शूटिंग पूर्ण करणार आहेत. त्यानंतर ते लोकेश कनगराजचा 'लिओ' चित्रपट करणार आहेत. या चित्रपटात थलपति विजय मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ते मुलगी ऐश्वर्याच्या 'लाल सलाम' या चित्रपटातही पाहायला मिळतील.  या चित्रपटात विष्णू विशाल आणि वृकांत मुख्य भूमिकेत आहेत, तर रजनीकांत यांचा कॅमिओ असणार आहे.

Web Title: Rajinikanth draws massive crowd of fans at Coimbatore airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.