Rajesh Khanna Birthday Special : असे धुमधडाक्यात झाले होते राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 06:30 AM2018-12-29T06:30:00+5:302018-12-29T06:30:03+5:30

डिम्पल आणि राजेश खन्ना यांनी दोघांनीही बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले होते. राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया हे दोघंही 70च्या दशकातले सुपरस्टार होते.

Rajesh Khanna Birthday Special: rajesh khanna dimple kapadia marriage | Rajesh Khanna Birthday Special : असे धुमधडाक्यात झाले होते राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांचे लग्न

Rajesh Khanna Birthday Special : असे धुमधडाक्यात झाले होते राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांचे लग्न

googlenewsNext
ठळक मुद्देया लग्नासाठी संपूर्ण बॉलिवूड पोहोचलं होतं. त्यावेळी हे लग्न इतकं गाजलं होतं की, त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्याआधी राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांच्या लग्नाची एक क्लिप दाखवण्यात येत असे. 

राजेश खन्ना यांचा आज म्हणजेच 29 डिसेंबरला वाढदिवस असून विशेष म्हणजे त्यांच्यासोबतच त्यांची लाडकी मुलगी ट्विंकल खन्नाचा देखील आजच वाढदिवस असतो. 'बाबू मोशाय जिन्दगी बड़ी होनी चाहिए लम्बी नहीं'... हा संवाद ऐकल्यावर आजही आपल्यासमोर त्यांचा चेहरा येतो. लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या 70-80च्या दशकातील या अभिनेत्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. अनेक तरूणींच्या गळ्यातील ते ताईत होते. त्यांचे लग्न ठरले हे कळल्यानंतर त्यांच्या अनेक महिला फॅन्सना खूपच वाईट वाटले होते. खूपच बोल्ड अभिनेत्री डिम्पल कपाडियाचीराजेश खन्ना यांनी त्यांची अर्धांगिनी म्हणून निवड केली होती. 

डिम्पल आणि राजेश खन्ना यांनी दोघांनीही बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले होते. राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया हे दोघंही 70च्या दशकातले सुपरस्टार होते. बॉलिवूडचे पहिले वहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यावेळची बोल्ड अभिनेत्री डिम्पल कपाडियाने जेव्हा एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं, त्यावेळी अनेक मासिकांनी याची दखल घेतली होती. त्यावेळचे सुपस्टार असलेले राजेश खन्ना तरूणींमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. डिम्पलसोबत त्यांनी ज्यावेळी लग्न केलं त्यावेळी अनेक तरूणींनी आत्महत्या केल्याच्या चर्चाही झाल्या होत्या. हे 70च्या दशकातलं सर्वात गाजलेलं लग्न होतं. आणखी एका कारणामुळे या लग्नाची जास्त चर्चा झाली होती ते म्हणजे ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी डिम्पल फक्त 16 वर्षांची असून तिचा एकही चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झालेला नव्हता. राजेश खन्नांनी ज्यावेळी लग्नाचा प्रस्ताव डिम्पलसमोर ठेवला त्यावेळी त्यांचे वय 31 वर्षं होतं. डिंपलने ज्यावेळी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घरच्यांना सांगितला त्यावेळी तिची आई या लग्नासाठी तयार नव्हती. पण डिम्पलच्या वडिलांची या लग्नाला परवानगी होती. कारण त्यांचा जावई राजेश खन्नांसारखा सुपस्टार बनणार होता. काही दिवसांनी डिम्पलच्या आई-वडिलांनीही या लग्नाला परवानगी दिली. लग्नाच्या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होती. चाहते आपल्या लाडक्या सुपस्टारच्या वरातीमध्ये सामील झाले होते. या लग्नासाठी संपूर्ण बॉलिवूड पोहोचलं होतं. त्यावेळी हे लग्न इतकं गाजलं होतं की, त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्याआधी राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांच्या लग्नाची एक क्लिप दाखवण्यात येत असे. 

Web Title: Rajesh Khanna Birthday Special: rajesh khanna dimple kapadia marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.