22 वर्षांपासून ‘गुमनाम’! एका विवाहित संगीतकाराच्या प्रेमात उद्धवस्त झाले या हिरोईनचे करिअर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 01:22 PM2020-05-14T13:22:31+5:302020-05-14T13:23:58+5:30

गोष्ट एका अफेअरची...

raja hindustani actress pratibha sinha controversial life and facts-ram | 22 वर्षांपासून ‘गुमनाम’! एका विवाहित संगीतकाराच्या प्रेमात उद्धवस्त झाले या हिरोईनचे करिअर!!

22 वर्षांपासून ‘गुमनाम’! एका विवाहित संगीतकाराच्या प्रेमात उद्धवस्त झाले या हिरोईनचे करिअर!!

googlenewsNext
ठळक मुद्दे992 साली ‘मेहबूब मेरे मेहबूब’ या सिनेमाद्वारे तिने करिअरला सुरुवात केली. पण तिचे फिल्मी करिअर फार छोटे राहिले.

24 वर्षांपूर्वी आलेल्या आमिर खान व करिश्मा कपूरच्या ‘राजा हिंदुस्तानी’ या सिनेमातील ‘परदेसी परदेसी’ हे गाणे आजही लोकांच्या स्मरणात आहे. या गाण्यातील ती बंजारन आठवते़ तिचे नाव प्रतिभा सिन्हा. अभिनेत्री प्रतिभा सिन्हा हिच्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. प्रतिभा ही दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी.

1992 साली ‘मेहबूब मेरे मेहबूब’ या सिनेमाद्वारे तिने करिअरला सुरुवात केली. पण तिचे फिल्मी करिअर फार छोटे राहिले. मोजून केवळ 13 सिनेमे तिच्या वाट्याला आलेत. करिअरपेक्षा  प्रतिभा सिन्हा तिच्या प्रेमप्रकरणामुळे जास्त चर्चेत राहिली.

1992 साली प्रतिभाने एन्ट्री घेतली आणि नेमक्या याच काळात एका विवाहित पुरूषाच्या प्रेमात वेडी झाली होती. तो कोण तर नदीम सैफी. होय,  प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवण मधील नदीम सैफीवर प्रतिभाचा जीव जडला होता. नदीम सैफी व प्रतिभा सिन्हाचे अफेअर त्याकाळी प्रचंड चर्चेत होते. नदीमच्या प्रेमात प्रतिभा इतकी वेडी झाली होती की, त्याच्यासाठी तिने तिचे फिल्मी करिअर डावावर लावले होते.

 प्रतिभाची आई माला सिन्हाला नदीम अजिबात आवडत नसे. त्यामुळे प्रतिभाने जगापासून आणि आईपासूनही आपले प्रेम लपवून ठेवले होते. अफेअरबद्दल कोणाला माहिती पडू नये म्हणून प्रतिभा व नदीम कोडवर्डमध्ये बोलत असत.  ऐकून आश्चर्य वाटेल पण  प्रतिभाचे कोड नेम Ambassador तर नदीमचे कोडनेम Ace होते. पण लपवून किती लपवणार? अखेर लोकांना दोघांच्या या कोडवर्डबद्दल कळलेच. मग काय प्रतिभा व नदीमला आपल्या प्रेमाची जाहीर कबुली द्यावी लागली.

माला सिन्हाने आपल्या लेकीला समजवण्याचे बरेच प्रयत्न केलेत. कारण नदीम आधीच विवाहित होता.  प्रतिभाला सुद्धा हे माहित होते, पण तरीही ती त्याला सोडायला तयार नव्हती.  शेवटी माला सिन्हा यांनी  प्रतिभाला कायमचे चेन्नईला पाठवले. यानंतर या लव्हस्टोरीत एक असे वळण आले की, सगळे काही संपले.

होय, अफेअर चव्हाट्यावर आल्यावर एका मुलाखतीत नदीम याबद्दल बोलला होता. पण तो असे काही बोलला की, सगळेच संपले़ ‘आई आणि मुलगी (माला सिन्हा व प्रतिभा) मिळून माझ्याशी गेम खेळत होत्या. माझ्या नावाचा वापर करून त्यांना पब्लिसिटी हवी होती. मी केवळ प्रतिभाची मदत करू इच्छित होतो. कारण ती टॅलेन्टेड आहे आणि म्हणून मी तिच्या जवळ गेलो होतो. पण आता आमच्यात काहीही नाही,’ असे नदीमने त्या मुलाखतीत सांगितले होते. यानंतर काय झाले असेल ती कल्पना तुम्ही करू शकतात.
1998 साली प्रदर्शित ‘मिल्ट्रीराज’ या सिनेमात प्रतिभा अखेरची दिसली होती. त्यानंतर ती जणू गायब झाली. आता ती आई माला सिन्हासोबत अज्ञातवासाचे आयुष्य जगतेय, एवढेच तिच्याबद्दल सांगितले जाते.

Web Title: raja hindustani actress pratibha sinha controversial life and facts-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.