'Raees' सिनेमाप्रमाणेच 'या'बॉलिवूड सिनेमांचेही झाले ट्रेनने प्रवास करत प्रमोशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 15:13 IST2017-01-25T09:37:15+5:302017-01-25T15:13:03+5:30
किंग खान शाहरुख आणि रेल्वेचे नातं काही वेगळंच आहे त्याच्या फॅन्सना माहितीच आहे. मग ते 'छैय्या छैय्या' गाणे असो ...

'Raees' सिनेमाप्रमाणेच 'या'बॉलिवूड सिनेमांचेही झाले ट्रेनने प्रवास करत प्रमोशन
क ंग खान शाहरुख आणि रेल्वेचे नातं काही वेगळंच आहे त्याच्या फॅन्सना माहितीच आहे. मग ते 'छैय्या छैय्या' गाणे असो किंवा मग 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमातील प्रसिद्ध ‘जा सिमरन जा सिमरन’ संवादावेळी घडणारा सीन असो.'डीडीएलजे'मधील काजोल ते 'चेन्नई एक्स्प्रेस'मधील दीपिका पादुकोण असो दरवेळी रेल्वे आणि शाहरुखचं दर्शन झालंच आहे. आता पुन्हा एकदा रेल्वे आणि शाहरुखचा संबंध आला. निमित्त ठरले आहे ते बादशाहच्या आगामी 'रईस' सिनेमाचं. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने रेल्वेचाच आधार घेतला. मात्र रेल्वेमधून प्रमोशन करणारा शाहरुख हा काही पहिला अभिनेता नाही. याआधी अनेकांनी रेल्वेतून प्रमोशन केले आहे. अशा प्रमोशनमुळे थेट प्रचंड गर्दीशी कनेक्ट होता येत असल्याने हा फंडा दिवसेंदिवस हिट होतोय. खालील सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी रेल्वेचा वापर झाल्याने प्रमोशन का नाम गाडी म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
बार बार देखो
![]()
'बार बार देखो' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या सिनेमाचे कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांनी रेल्वेचा आधार घेतला. कोलकातामध्ये एका ट्रेनमधून सिद्धार्थ आणि कॅटने प्रवास केला. इतकंच नाही तर या सिनेमातील काला चष्मा या गाण्यावरही दोघांनी ट्रेनमध्येच ताल धरला. हे पाहून ट्रेनमधील प्रवाशांनीसुद्धा या दोन्ही कलाकारांसह ठेका धरला
24 – सीझन 2
![]()
झक्कास स्टार अभिनेता अनिल कपूरच्या '24' या सिरीजला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळेच त्याच्या 24 सिरीजच्या दुस-या सीझनची रसिकांना उत्सुकता होती. सीझन 2 सुरु होण्याआधी अनिल कपूरनेही त्याच्या प्रमोशनसाठी रेल्वेचाच मार्ग स्वीकारला. यावेळी अनिल कपूरने मुंबईतल्या लोकलमधून प्रवास केला. यावेळी तो इतका उत्साहित होता की त्याने लोकलमध्ये लटकून प्रवास केला. त्याचा हा अतिउत्साह त्याला चांगलाच भोवला. कारण पश्चिम रेल्वेने अनिल कपूरच्या स्टंटमुळे संबंधित प्रोडक्शन हाऊसला नोटीस बजावली.
तेरी मेरी कहानी
![]()
अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचा तेरी मेरी कहानी हा सिनेमा. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहिद आणि पिग्गी चॉप्सनं मुंबई लोकलनं प्रवास केला.
तमाशा
![]()
किंग खान शाहरुखप्रमाणे दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या सिनेमातही रेल्वेचा काही ना काही रोल असतोच असतो. मग ते जब वी मेट असो किंवा मग लव आज कल किंवा मग तमाशा. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण स्टारर तमाशा या सिनेमाचं प्रमोशन तर इम्तियाजने थेट ट्रेनमधूनच केलं. यावेळी रणबीर, दीपिका आणि खुद्द इम्तियाज यांनी राजधानी एक्स्प्रेसमधून मुंबई ते दिल्ली प्रवास केला.
हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ
![]()
अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ हा सिनेमा. या सिनेमाच्या पब्लिसिटीही ट्रेननं करण्यात आली. मात्र ही मेट्रो ट्रेन होती. त्यावेळी मुंबईत नुकतंच मेट्रोची सुरुवात झाली होती. त्यामुळे मुंबईकरांमध्ये मेट्रोचं कुतुहल होतं. हीच बाब लक्षात घेऊन आलिया आणि वरुणनं मेट्रोनं प्रवास करत सिनेमाचं प्रमोशन करण्याचं ठरवलं. त्यावेळी आलियाला पायाला जखम झाली होती. तरीही त्याची पर्वा न करता आलियानं वरुणसह मेट्रोनं प्रवास केला.
तीस मार खान
![]()
खिलाडी अक्षय कुमारच्या तीस मार खान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ट्रेनचा मोलाचा वाटा होता. या सिनेमाचं म्युझिक ट्रेनमध्येच लॉन्च करण्यात आलं होतं. यासाठीखिलाडी अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांनी मुंबई ते लोणावळा असा ट्रेन प्रवास केला होता.